मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची पुन्हा निवड; उपाध्यक्षपदी अविनाश जाधवगुजरातमध्ये महाराष्ट्रातील कुटुंबाला कालव्यात जिवंत फेकले; तिघांचे मृतदेह सापडले, 13 वर्षीय मुलगा बचावला तर दोन मुले अद्याप बेपत्ता'संविधान सन्मान दौडी'निमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक व्यवस्थेत बदलखुनाच्या प्रयत्नातील आरोपी जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट-१ ची कारवाई26 नोव्हेंबरला मुंबईत राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक; सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे आणि रोहित पवार उपस्थित राहणार,मोर्चावर निर्णयाची शक्यता“गेल्या १२ वर्षांपासून माझा शपथविधी होतोय”; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

काळेवाडीत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चार जणांना अटक

पीडिताशी आरोपींचा किरकोळ वाद होता त्याच्या रागातून घडला प्रसंग

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

काळेवाडीत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चार जणांना अटक

पीडिताशी आरोपींचा किरकोळ वाद होता त्याच्या रागातून घडला प्रसंग

पिंपरी: जुन्या वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (२३ मे) रात्री पावणेदहाच्या सुमारास काळेवाडी येथील एम. एम. चौकात घनकचरा स्थलांतर केंद्रासमोर घडली.

अजित राजू चौगुले (२५, रा. चिंचवड), अनिकेत राजेंद्र तुपे (१९), सचिन बाबासाहेब चौधरी (२६) आणि वसिम बाबर खान (वय २८, तिघे रा. थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सचिन संपत शिंदे (२५, रा. चिंचवड) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मेव्हणा विशाल भोसले याच्याशी आरोपींचा किरकोळ वाद झाला होता. त्याच रागातून आरोपींनी विशालला गाठून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर धारदार हत्याराने त्याच्या पाठीवर वार करीत जीवे मारण्‍याचा प्रयत्‍न कला. यात विशाल गंभीर जखमी झाला. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

शेअर करा