मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
प्यूर्टो रिकोची जेनिफर बॅरेटो ‘मिस युनिव्हर्स २०२६’लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची पुन्हा निवड; उपाध्यक्षपदी अविनाश जाधवगुजरातमध्ये महाराष्ट्रातील कुटुंबाला कालव्यात जिवंत फेकले; तिघांचे मृतदेह सापडले, 13 वर्षीय मुलगा बचावला तर दोन मुले अद्याप बेपत्ता'संविधान सन्मान दौडी'निमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक व्यवस्थेत बदलखुनाच्या प्रयत्नातील आरोपी जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट-१ ची कारवाई26 नोव्हेंबरला मुंबईत राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक; सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे आणि रोहित पवार उपस्थित राहणार,मोर्चावर निर्णयाची शक्यता

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची पुन्हा निवड; उपाध्यक्षपदी अविनाश जाधव

नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’चा दणदणीत विजय

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची पुन्हा निवड
उपाध्यक्षपदी अविनाश जाधव

लातूर :- लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी अविनाश जाधव यांची निवड झाली आहे. नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत या दोन्ही निवडींवर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे.एकूण 19 जागांपैकी सहकार पॅनेलने तब्बल 14 जागांवर विजय मिळवला होता. तर महायुतीच्या परिवर्तन पॅनेलला केवळ 5 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. या निकालातून सहकार पॅनेलला संचालक मंडळात स्पष्ट बहुमत मिळालं होतं.

धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या कारभारात सातत्य कायम; सहकार मंत्र्यांच्या चुलत बंधूंना उपाध्यक्षपदाची संधी

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने जोरदार मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवले होते. निवडणुकीच्या निकालात ‘सहकार पॅनेल’ने बहुसंख्य जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले, तर महायुतीच्या ‘परिवर्तन पॅनेल’ला पराभवाचा सामना करावा लागला.या बहुमताच्या जोरावर नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी धीरज देशमुख यांचे नाव निश्चित करण्यात आले. दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना बँकेच्या कारभारात सातत्य राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

राजकीय समीकरणे आणि उपाध्यक्ष निवड

बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले अविनाश जाधव हे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चुलत बंधू आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय गणिते आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे लातूरच्या सहकार व राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper