मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

काळेवाडीत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चार जणांना अटक

पीडिताशी आरोपींचा किरकोळ वाद होता त्याच्या रागातून घडला प्रसंग

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

काळेवाडीत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चार जणांना अटक

पीडिताशी आरोपींचा किरकोळ वाद होता त्याच्या रागातून घडला प्रसंग

पिंपरी: जुन्या वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (२३ मे) रात्री पावणेदहाच्या सुमारास काळेवाडी येथील एम. एम. चौकात घनकचरा स्थलांतर केंद्रासमोर घडली.

अजित राजू चौगुले (२५, रा. चिंचवड), अनिकेत राजेंद्र तुपे (१९), सचिन बाबासाहेब चौधरी (२६) आणि वसिम बाबर खान (वय २८, तिघे रा. थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सचिन संपत शिंदे (२५, रा. चिंचवड) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मेव्हणा विशाल भोसले याच्याशी आरोपींचा किरकोळ वाद झाला होता. त्याच रागातून आरोपींनी विशालला गाठून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर धारदार हत्याराने त्याच्या पाठीवर वार करीत जीवे मारण्‍याचा प्रयत्‍न कला. यात विशाल गंभीर जखमी झाला. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

शेअर करा