मुंबई

Mumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटक

• दुचाकीवरून आलेल्या तरुणांच्या मारहाणीत 18 वर्षीय शुभंकरचा मृत्यू; जुहू पोलीस ठाण्यात बीएनएस कलमांन्वये गुन्हा दाखल

मुंबई :- जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत फटाका फोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 18 वर्षीय तरुणाची निघृण हत्या करण्यात आल्याची अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांपैकी एका 24 वर्षीय आणि एका 22 वर्षीय आरोपीसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. या हत्येमुळे विलेपर्ले व जुहू परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

फटाका फोडण्याच्या वादातून दुचाकीस्वारांची धडक कारवाई आणि प्राणघातक हल्ला

सहकारी भंडार सिग्नेचर दुकानासमोर घडली दुर्दैवी घटना; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

दिनांक 08 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी राकेशकुमार विद्यानंद चौधरी (वय 24, रा. विलेपर्ले) हे विलेपर्ले येथील व्ही.एम. रोडवरील सानिध्य बिल्डिंग आणि एचडीएफसी बँकेच्या समोरील फुटापाथवर असताना ही घटना घडली. याच दरम्यान बुलेट मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी रस्त्यावरील बुलेटजवळ फटाका फोडल्याच्या कारणावरून फिर्यादीशी वाद घातला. या वादातून आरोपींनी फिर्यादीला हाताने मारहाण केली आणि याच वेळी तिथे असलेल्या 18 वर्षीय शुभंकर याला जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शुभंकरच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात, कलम 103(1), 115(2), 3(5) बीएनएस 2023 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button