Pune News : लक्ष्मीपूजनासाठी व्यापारी सज्ज; बाजारपेठा रोषणाईने उजळल्या!
Pune News : नव्या नोटा, नाणी, चांदीचे शिक्के आणि पूजेच्या साहित्याची खरेदी; खतावणी पूजनातून नव्या आर्थिक वर्षाचा श्रीगणेशा
Pune News :पुणे : दिवाळीच्या उत्साहात आता लक्ष्मीपूजनाची लगबग वाढली असून, मार्केट यार्डसह शहरातील प्रमुख बाजारपेठा विद्युत रोषणाईने उजळून निघाल्या आहेत. वर्षभराच्या व्यापारात भरभराट व्हावी, सुख-समृद्धी लाभावी, या श्रद्धेने व्यापारी वर्गाने लक्ष्मीपूजनाची जय्यत तयारी केली आहे. दुकानांची स्वच्छता, रंगरंगोटी आणि आकर्षक सजावट पूर्ण झाली असून, पूजेसाठी आवश्यक साहित्याची खरेदीही अंतिम टप्प्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
लक्ष्मीपूजनासाठी व्यापाऱ्यांनी नवीन नोटा, विविध मूल्यांची नाणी आणि चांदीचे शिक्के खरेदी केले आहेत. गणपती-लक्ष्मीच्या मूर्तींसह ऊस, लाह्या, फुले, हळद-कुंकू आणि लक्ष्मीची पावले अशा पूजेच्या साहित्याचीही बाजारात खरेदी सुरू आहे. शुभ, लाभ आणि अमृत या मुहूर्तांवर व्यापारी लक्ष्मीपूजन करणार आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
व्यापाऱ्यांसाठी लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्त्व असून, या दिवशी केवळ धनलक्ष्मीची पूजा केली जात नाही, तर व्यवसायाच्या हिशेबाचीही पूजा केली जाते. वर्षभरातील आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवणाऱ्या खतावणीचे पूजन ही महत्त्वाची परंपरा आहे. यासाठी व्यापाऱ्यांनी नवीन खतावण्यांची खरेदी केली आहे. पूजनानंतर खतावणीच्या पहिल्या पानावर हळद-कुंकू वाहून ‘श्री’ लिहिले जाते आणि नव्या वर्षाच्या व्यवहारांची सुरुवात केली जाते.
“लक्ष्मीपूजनासाठी व्यापाऱ्यांची बहुतांश तयारी पूर्ण झाली आहे. चोपड्यांची खरेदी तसेच वजन-मापांची स्वच्छताही करण्यात आली आहे. व्यापारी आपल्या सोयीनुसार शुभ, लाभ आणि अमृत मुहूर्तावर पूजन करतील,” अशी माहिती दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली. दरम्यान, लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये दिवाळीचा उत्साह आणि खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे.


