क्राईम न्यूजपुणे

Pune Crime : ५ लाखांच्या खंडणीसाठी निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यावर पुण्यात जीवघेणा हल्ला

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : बालगंधर्व रंगमंदिरातील एका कार्यक्रमाच्या ५ लाख रुपयांच्या कथित थकीत रकमेच्या वादातून एका ६५ वर्षीय निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात घुसून टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील महंमदवाडी येथील न्याती हायलँड-१ या सोसायटीत २४ सप्टेंबर २०२६ च्या रात्री ही घटना घडली.https://maharashtramirror.com/ Pune Crime

या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात दिव्या शिंदे, तिचा साथीदार आण्णा डमढेरे आणि इतर ८ ते १० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर दादासाहेब गायकवाड यांच्यावर सध्या ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये उपचार सुरू आहेत.https://maharashtramirror.com/ Pune Crime

५ लाखांची मागणी अन् धमक्यांचा सत्र

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. गायकवाड हे २०२१ मध्ये पुणे कंटोनमेंट रुग्णालयातून वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले असून ते सध्या ‘करुणादीप फाउंडेशन’ या संस्थेचे सदस्य आहेत. या संस्थेने १ ते ३ सप्टेंबर २०२६ दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर येथे ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला दिव्या शिंदे विनानिमंत्रण उपस्थित राहिली होती. त्यानंतर तिने डॉ. गायकवाड यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली.

१७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दिव्या शिंदे, आण्णा डमढेरे व इतर दोन जण डॉ. गायकवाड यांच्या घरी आले. त्यावेळी डॉ. गायकवाड घरी नसल्याने आरोपींनी त्यांच्या पत्नी व मुलाला ५ लाख रुपये न दिल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी आण्णा डमढेरे याने डॉ. गायकवाड यांना शिवाजीनगर येथील एका हॉटेलबाहेर भेटून पुन्हा पैसे न दिल्यास घरी माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी दिली. डॉ. गायकवाड यांनी आपण केवळ संस्थेचे सदस्य असल्याचे आणि आपल्याला पॅरालिसिस (पक्षाघात) झालेला असल्याचे सांगितले, परंतु आरोपींनी धमक्या देणे सुरूच ठेवले.

घरात घुसून लोखंडी पॉट, लाकडी दांडक्याने हल्ला

२४ सप्टेंबर रोजी रात्री ८:३० च्या सुमारास डॉ. गायकवाड आजारपणामुळे घरात एकटेच विश्रांती घेत असताना आण्णा डमढेरे याने दरवाजा वाजवला. डॉ. गायकवाड यांनी दरवाजा उघडताच दिव्या शिंदे आणि तिचे ८ ते १० साथीदार जबरदस्तीने घरात घुसले.

काहीही न विचारता आरोपींनी डॉ. गायकवाड यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. “माझा माणूस पैसे मागायला आला असताना तू पैसे का दिले नाहीस, याला जिवंत सोडू नका,” असे म्हणत दिव्या शिंदे हिने चिथावणी दिली. त्यानंतर एका आरोपीने धारदार हत्याराने डॉ. गायकवाड यांच्या डोक्यावर वार केला. तसेच लाकडी दांडके, बेल्ट आणि घरातील लोखंडी पॉटने त्यांच्या तोंडावर, पाठीवर आणि मानेवर गंभीर वार केले. आरोपींनी घरातील साहित्याची तोडफोड केली व टाटा कंपनीच्या गाडीचे चार्जरही तोडले.

डॉ. गायकवाड यांचा मुलगा आणि सून घरी परतल्यानंतर आरोपींनी त्यांनाही धमकी दिली. ५ लाख रुपये देईपर्यंत चारचाकी गाडी (MH 12 US 3069) घेऊन जाण्याचा प्रयत्न आरोपींनी केला आणि जबरदस्तीने कागदावर लिहून घेतले. डॉ. गायकवाड यांचे भाऊ महेंद्र गायकवाड हे पोलिसांना घेऊन घटनास्थळी पोहोचल्यानंतर आरोपी पसार झाले. पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक गिरीषा अभ्युदय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित बाळासाहेब शेते या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button