पुणेपिंपरी चिंचवड

Pune News : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातफे आवाहन दिवाळीनिमित्त शनिवारी असणारी रिक्षा मीटर तपासणी बंद

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर – प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांच्या ३ ऑगस्टच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षांसाठी नवीन भाडेदरवाढ १ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. या भाडेदरवाढीच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालक व मालकांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे द्वारे शासकीय कामकाजाच्या दिवसाव्यतिरिक्त शनिवारीदेखील रिक्षा मीटर तपासणीचे कामकाज सुरू ठेवण्यात आले होते.https://maharashtramirror.com/ Pune News
तथापि,दिवाळीनिमित्त शनिवार (दि,७) व शनिवार (दि.१४ )रोजी मीटर तपासणीचे कामकाज बंद राहणार आहे, अशी महत्त्वाची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली आहे. सर्व ऑटोरिक्षा चालक आणि मालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे..https://maharashtramirror.com/ Pune News

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button