Mumbai News : शरद पवारांची प्रकृती बिघडली; पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, गौतम अदानींसह बड्या नेत्यांनी घेतली भेट!
Mumbai News : मुंबई – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांनीही रुग्णालयात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे या सध्या शरद पवार यांच्यासोबत रुग्णालयात उपस्थित आहेत. त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्याही करण्यात येणार असल्याची माहिती आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
दरम्यान, उद्योगपती गौतम अदानी यांनीही सकाळीच ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचून शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अदानी रुग्णालयात आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राजकीय आणि उद्योग क्षेत्रात या भेटीची चर्चा सुरू झाली आहे.
प्रफुल पटेल यांच्या भेटीने राजकीय चर्चांना वेग
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी रात्री उशिरा रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये काही वेळ संवादही झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आज सकाळी मंत्री छगन भुजबळ यांनीही शरद पवार यांची भेट घेतली.
विशेष म्हणजे, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी आणि पार्थ पवार यांच्या भूमिकेवरून पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पक्षातील काही महत्त्वाचे निर्णय वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता घेतले जात असल्याचा आरोपही केला जात आहे.
अशा राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीमागे नेमकी कोणती राजकीय चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.एकीकडे शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असताना, दुसरीकडे त्यांच्या भेटीसाठी नेत्यांची सुरू असलेली गर्दी आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.


