ठाणेमुंबई

Thane Water Cut : ठाण्यात बुधवार 12 तास पाणीपुरवठा बंद!

Thane Latest Water Cut News : पिसे उदंचन केंद्र आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल-दुरुस्तीची कामे

ठाणे :- महापालिकेने नागरिकांना TMC पाणी साठवण्याचे व काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले असून बुधवार, (21 मे) रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत ठाणे शहरातील अनेक भागांचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. Thane Water Supply Latest News

देखभाल-दुरुस्तीच्या कालावधीत घोडबंदर रोड, वर्तक नगर, समता नगर, कारागृह परिसर, गांधी नगर, सिद्धांचल, रुस्तमजी, इटर्निटी, जॉन्सन, ऋतू पार्क आणि कळव्याचे काही भाग अशा प्रमुख परिसरांमध्ये पाणी मिळणार नाही.

महानगरपालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की, या काळात आवश्यक पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. तसेच, पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर काही भागात कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे.

महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून कामे वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button