मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
सूर्यकुमार यादवची तुफानी खेळी! १५ चेंडूंत अर्धशतक, २१ चेंडूंत नाबाद ६० धावा; मुंबईचा दणदणीत विजयबसमधील गर्दीचा फायदा घेत ७३ वर्षीय महिलेची सोन्याची बांगडी चोरीलानॉर्थ मेन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २१.४ कोटींचे भूसंपादनएमपीएससीच्या नऊ परीक्षांतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी मुदतवाढ; २३ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करा'जिजाई'वर पार्थ पवारांची आमदारांसोबत खलबतेआळंदी जवळील गावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

Uddhav Thackeray : चैत्यभूमीवर 'ठाकरे' गटाकडून गटाकडून बाबासाहेबांना आदरांजली! - उद्धव ठाकरे यांनी अनुयायांसोबत महामानवाला केले विनम्र अभिवादन

•आदित्य ठाकरे, अनिल देसाईंसह अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती; राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनीही वाहिली मानवंदना

V
Vivek

1 मिनिट वाचन

Uddhav Thackeray : चैत्यभूमीवर 'ठाकरे' गटाकडून गटाकडून बाबासाहेबांना आदरांजली! - उद्धव ठाकरे यांनी अनुयायांसोबत महामानवाला केले विनम्र अभिवादन

•आदित्य ठाकरे, अनिल देसाईंसह अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती; राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनीही वाहिली मानवंदना

मुंबई/दादर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दादर येथील चैत्यभूमीवर त्यांना विनम्र अभिवादन केले.

छायाचित्रे · 1/4

Arrow Keys ⟵ ⟶

यावेळी त्यांच्यासोबत युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य, आमदार सुनिल शिंदे, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, माजी महापौर श्रद्धा जाधव आणि इतर अनेक पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवार गटाचे नेतेही उपस्थित

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) नेतेही उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही चैत्यभूमीवर महामानवाला मानवंदना दिली.

6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो अनुयायांच्या साक्षीने विविध पक्षांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले होते.

हेही वाचा: Amit Shah : 'सामाजिक न्यायाचा सर्वोच्च आदर्श' - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र वंदन

शेअर करा