मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Amit Shah : 'सामाजिक न्यायाचा सर्वोच्च आदर्श' - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र वंदन

•'शिक्षा' (शिक्षण) हा सामाजिक परिवर्तनाचा मूलमंत्र, तर 'संविधान' सशक्त भारताचा आधार; शहा यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Amit Shah : 'सामाजिक न्यायाचा सर्वोच्च आदर्श' - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र वंदन

•'शिक्षा' (शिक्षण) हा सामाजिक परिवर्तनाचा मूलमंत्र, तर 'संविधान' सशक्त भारताचा आधार; शहा यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला.

नवी दिल्ली :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांच्या कार्याला वंदन करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. अमित शहा यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत, शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे मूळ मंत्र मानणाऱ्या संविधान-शिल्पींनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला.

गृहमंत्री शहा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी श्रमिक, शेतकरी आणि समाजातील दुर्बळ घटकांना त्यांचे अधिकार देऊन सामाजिक न्यायाचा सर्वोच्च आदर्श स्थापित केला.
समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सशक्त भारताचा पाया रचणाऱ्या बाबासाहेबांनी राष्ट्रजीवनाच्या प्रत्येक पैलूवर आपली अमिट छाप सोडली आहे. शहा यांनी बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना म्हटले आहे की, "सागर-सा विराट त्यांचा व्यक्तित्व आणि हिमालय समान विशाल त्यांचे कार्य प्रत्येक देशवासीयासाठी लोकसेवेचा महान आदर्श आहे."

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने डॉ. भीमराव आंबेडकर यांना विनम्र वंदन केले आहे

हेही वाचा: Indu Mill : इंदू मिल स्मारकाचे 50 टक्के काम पूर्ण! - पुढील महापरिनिर्वाण दिनी स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस

शेअर करा