Today’s Weather Update : मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पावसाची रिमझिम
•Today’s Weather forecast Update मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात येत्या काही तासात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई :- मोठ्या विश्रांतीनंतर मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. शनिवारी ( 24 ऑगस्ट) सकाळपासूनच मुंबईसह राज्यात पावसाचे रिमझिम चालू झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाचा रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट दिली आहे. Today’s Weather Update मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात येत्या तीन, चार तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने कोकण, गोवा आणि घाट भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे. येत्या तीन, चार दिवस सर्वच भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे.
हवामान विभागाने मुंबई आणि मुंबई परिसरातील भाग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत 24 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. Today’s Weather Update पुणे, सातारा, सोलापूर, ठाणे, बीड, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. रायगड आणि रत्नागिरीत मात्र रेड अलर्ट दिला आहे.