Crime News : ठाण्यातील ९३ लाखांच्या सायबर गुन्ह्यातील फरार आरोपी ताब्यात

पुणे शहर वाहतूक पोलिसांची कारवाई
पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ९३ लाख रूपयांच्या सायबर आर्थिक फसवणूक प्रकरणातील दोन फरार आरोपींना पुणे शहर वाहतूक शाखेच्या फरासखाना विभागातील पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींना पुढील कारवाईसाठी कोपरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.Crime News
अक्षय संजय तांबे (वय २२), ओंकार विष्णू शिरसाठ (वय २४) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरी पोलिस ठाण्यात ९३ लाख रूपयांच्या सायबर आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे या गुन्ह्यातील फरार आरोपी हे पुण्यातील अाप्पा बळवंत चौक परिसरात आल्याची माहिती कोपरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पुणे शहर फरासखाना वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हात्रे यांना दिली. यानंतर फरासखाना वाहतूक विभागाच्या पथकाने शोधमोहिम राबवली. यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांची त्यांच्या मोपेडसह चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. वाहनासंदर्भातील कारवाई सुरू असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे ९३ लाख रूपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोन्ही आरोपींना फरासखाना वाहतूक विभाग कार्यालयात आणून कोपरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर दोघांनाही ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.Crime News
ही कारवाई पोलीस हवालदार खरात, पोलीस शिपाई शेख, पोलीस शिपाई कानवडे, विश्रामबाग वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार गौड आणि पोलीस हवालदार प्रधान यांनी केली.
प्रभावी समन्वयामुळेच आरोपी ताब्यात
पुणे शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि ठाणे पोलिसांशी प्रभावी समन्वयामुळे गंभीर आर्थिक गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना ताब्यात घेणे शक्य झाले. अशा गुन्ह्यांतील आरोपींविरुद्ध समन्वयाने कारवाई पुढेही सुरू राहील, असे पुणे शहर वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.Crime News
Crime News


