Thane Rape News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधाम तरुणास 20 वर्षे सक्तमजुरी

•या खटल्याचा निकाल विशेष जिल्हा न्यायाधीश डी.एस. देशमुख यांनी दिला. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी युक्तिवाद केला.
ठाणे :- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून विशेष न्यायालयाने आरोपी महेश सखाराम कांबळे (23 वय , रा.घोलाईनगर, कळवा, ठाणे) यास 20 वर्षे सक्तमजुरी व विविध कलमान्वये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी ही माहिती दिली.
या खटल्याचा निकाल विशेष पोस्को न्यायालय, ठाणे न्यायाधीश डी.एस. देशमुख यांनी दिला. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी युक्तिवाद केला. खटल्यात अनेक साक्षीदार तपासण्यात आले. घटना घडली, 17 ऑगस्ट 2021 रोजी, त्यावेळेस पिडीत मुलगी 13 वर्ष वयाची होती.
खटल्याची माहिती अशी,आरोपी महेश सखाराम कांबळे याने एका 13 वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. आरोपीच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कायदा कलम 379 सह पोस्को 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल होता. गुन्हयाच्या तपासात तत्कालीन तपासी अधिकारी सुदेश आजगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) व त्यांचे तपास पथकाने भक्कम पुरावे गोळा करून आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.