पुणे

PUNE NEWS : पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांची तत्परता;

प्रवाशाला हरवलेले पाकिट मिळाले परत

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS : घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, त्यांचे एक छोटे पाकीट बसमध्येच राहिले आहे. त्या पाकिटामध्ये ८,७०० रोख रक्कम तसेच घराच्या कुलपाची चावी होती. हे लक्षात येताच त्या घाबरलेल्या अवस्थेत वारजे गणपती माथा पीएमपीएमएल स्थानकावर आल्या. त्यांच्या जवळ प्रवासाचे तिकीट असल्यामुळे त्यांनी तेथील स्टार्टर हरिश्चंद्र तांदळे यांच्याकडे धाव घेतली आणि संपूर्ण घटना रडत रडत सांगितली. यावेळी पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मुद्देमालासह त्यांचे पाकिट पुन्हा मिळाले.PUNE NEWS

प्रवासी सुनिता नेताजी यावे या बसने कर्वे पुतळा येथून प्रवास करत होत्या. गणपती माथा येथे बस थांबल्यानंतर त्या उतरून घरी गेल्या. मात्र, घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, त्यांचे एक छोटे पाकीट बसमध्येच राहिले आहे. त्यामुळे त्यांनी लगेच गणपती माथा पीएमपीएमएल स्थानकावर धाव घेतली. यावेळी तांदळे यांनी सर्वप्रथम त्यांच्याकडील तिकीट तपासले. तिकीट क्रमांक १४४/३ असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ एनडीए गेट क्रमांक १० येथील स्टार्टर राजाभाऊ ओव्हाळ यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली.PUNE NEWS

दरम्यान, संबंधित बस एनडीए गेट क्रमांक १० येथे पोहोचली. राजाभाऊ ओव्हाळ यांनी बसचे चालक गणेश कदम यांना पाकिटाबाबत विचारणा केली. त्यावर चालकांनी सांगितले की, बसमध्ये एक पाकीट सापडले असून ते त्यांनी सुरक्षिततेसाठी वाहक गणेश बारवकर यांच्याकडे सुपूर्द केले आहे. तसेच, त्यांनी स्टार्टर तांदळे यांना फोन करून यावे यांना सांगितले की, “काळजी करू नका, तुमचे पाकीट आणि त्यातील सर्व रक्कम सुरक्षित आहे. संबंधित बस पंधरा मिनिटांत गणपती माथा येथे येईल आणि तुम्हाला तुमचे पाकीट परत मिळेल.”PUNE NEWS

काही वेळातच बस गणपती माथा येथे पोहोचली. चालक गणेश कदम, वाहक गणेश बारवकर आणि स्टार्टर हरिश्चंद्र तांदळे यांच्या उपस्थितीत यावे यांना त्यांचे पाकीट मुद्देमालासह परत करण्यात आले. यानंतर संबंधित पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

PUNE NEWS

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button