Vadodara News : झूठ की गूंजपासून सावध राहा, सत्याच्या बाजूने उभे राहा : मोदी
Vadodara News : मोदींनी साधला जेन-झी शी संवाद
Vadodara News : वडोदरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडोदरा येथे जेन-झी अर्थात तरुण पिढीशी संवाद साधत त्यांना दिशाभूल करणाऱ्या प्रचारापासून सावध राहण्याचे आवाहन केले. सुमारे सहा हजार तरुणांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात मोदींनी ‘झूठ की गूंज’द्वारे तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र त्यांनी सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहावे, असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याचा संबंध राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ‘छात्रों की गूंज’ मोहिमेशी जोडला जात आहे.https://maharashtramirror.com/ vadodara News
मोदींच्या स्वागतासाठी कार्यक्रमस्थळी विशेष ‘वाय’ आकाराचा रॅम्प उभारण्यात आला होता. भाषणापूर्वी मोदींनी रॅम्पवरून चालत तरुणांशी संवाद साधला. मंचावर येताना ‘क्वीन’च्या ‘वुई विल रॉक ऑन’ या गाण्यानंतर ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘आरी आरी’ हे गाणेही वाजवण्यात आले.
यावेळी मोदींनी केंद्र सरकारच्या विविध विकासकामांची माहिती दिली. २००४ मध्ये संकल्पना मांडल्यानंतर अनेक वर्षे रखडलेला डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प २०१४ नंतर वेगाने पूर्ण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सुमारे २ हजार किमी मालवाहू कॉरिडॉरचे काम पूर्ण झाले असून, यामुळे मालवाहतुकीचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ vadodara News
भारत रेल्वे डबे आणि इंजिन निर्मितीत आघाडीवर येत असून, देशात कौशल्यविकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी सक्षम परिसंस्था उभारण्यावर भर दिला जात असल्याचेही मोदी म्हणाले.https://maharashtramirror.com/ vadodara News
दरम्यान, २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीनुसार १८ ते २९ वयोगटातील मतदार देशातील एकूण मतदारसंख्येच्या २२.७८ टक्के होते. त्यामुळे जेन-झी मतदारांकडे राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असल्याचे दिसून येत आहे.



