पुणे

Social News : युवा पिढीवर राष्ट्र प्रेमाचे संस्कार घडवणे आवश्यक

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे प्रतिपादन

पुणे, महाराष्ट्र मिरर Social News : अनेकांच्या त्याग आणि बलिदानाने मिळालेले स्वराज्य टिकवण्यासाठी आणि सुराज्य घडवण्यासाठी युवा पिढीवर राष्ट्र प्रेमाचे संस्कार घडवणे आवश्यक आहे. त्यासाठीचे सामर्थ्य ‘वंदे मातरम’ या राष्ट्र मंत्रात आहे, अशा शब्दांत खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी ‘वंदे मातरम’ या गीताचा महिमा कथन केला. यावेळी त्यांनी सध्या संपूर्ण वंदे मातरम युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याची आग्रही अपेक्षा व्यक्त केली.Social News

नागरी सोशल फाउंडेशनच्या शिक्षण विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘संपूर्ण वंदे मातरम गायन’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात खासदार कुलकर्णी बोलत होत्या. या कार्यक्रमाला महापौर मंजुषा नागपुरे, वंदे मातरमचे अभ्यासक मिलिंद सबनीस, नागरिक सोशल फाऊंडेशनचे विश्वस्त अमेय सप्रे, स्पर्धेच्या समन्वयक डॉ.  शीतल गोडबोले, स्मिता देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.Social News

‘वंदे मातरम’ या गीताचे स्मरण होत असताना घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी स्वतंत्र भारतात वंदे मातरम या गीतालाही राष्ट्रगीताचाच दर्जा प्राप्त असेल, असे नमूद करून ठेवले होते. मात्र, त्यानंतर दीर्घकाळ सत्ताधाऱ्यांकडून हा दर्जा डावलण्यात आला. या गीताबद्दल बुद्धिभ्रंश करण्यात आला. विशिष्ट समाज घटकाचा अनुनय करण्यासाठी ‘वंदे मातरम’ ला डावलण्यात आले. मात्र, विद्यमान सरकारने या गीताला सन्मान प्रदान करणारे विधेयक संमत केले आहे, असेही खासदार कुलकर्णी यांनी नमूद केले.Social News

भारताला मिळालेले स्वातंत्र्य सहजपणे मिळालेले नाही. हे स्वातंत्र्य बिना खड्ग, बिना ढाल, मिळाल्याचा अपप्रचार केला जातो. मात्र, त्यात तथ्य नाही. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी देहाची ढाल करून शरीरावर शस्त्र झेलून बलिदान दिले आहे. मोठ्या त्यागातून मिळालेले हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सक्षम युवा पिढी घडवण्याचे कार्य आपण सर्वांनी करणे आवश्यक आहे, असेही कुलकर्णी म्हणाल्या.

या स्पर्धेला विद्यार्थी, पालक आणि शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. डॉ. शीतल गोडबोले यांनी स्पर्धा आयोजनामागील भूमिका विषद केली. अमेय सप्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सायली गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. िस्मता देशपांडे यांनी आभार मानले.Social News

Social News

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button