महाराष्ट्र
Pune Accident news: पीएमपी बसमधून पडून एका तरुणीचा मृत्यू
पीएमपी बसमधून पडून एका तरुणीचा मृत्यू
Pune Accident news: पुणे : सोमवारी सकाळी सिंहगड रोडवर ब्रह्मा हॉटेल समोर खानापूर वरून येणाऱ्या खानापूर ते स्वारगेट या पीएमपीएलच्या बसमधून एक तरुणी खाली पडल्याची घटना घडली. बसमधे प्रचंड गर्दी असल्याने ही तरुणी तोल जाऊन खाली पडली. यावेळी पाठीमागून शाळेची एक बस येत होती. ही तरुणी नेमकी त्या बसच्या चाकाखाली आली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पुण्यातील हळहळ व्यक्त केली जात आहे.

