khopoli News : पाम तेलाचा टँकर एक्स्प्रेस वेवर उलटून पेटला; चालक सुखरूप बचावला
khopoli News : खोपोली पोलीस स्टेशन हद्दीतील घटना; विविध यंत्रणांच्या तत्परतेने मोठी जीवितहानी टळली

khopoli News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाम तेलाने भरलेला टँकर उलटून त्याला आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. अपघातानंतर टँकरच्या केबिनमध्ये चालक अडकल्याने काही काळ घटनास्थळी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र विविध यंत्रणांनी तत्परतेने बचावकार्य राबवून चालकाला सुखरूप बाहेर काढले. टँकर क्रमांक MH-04/KF-7614 वरील चालक इर्शाद अहमद रहमान (वय 27, रा. बस्ती, उत्तर प्रदेश) हे बंगळूर येथून पाम तेल भरून तलोजाच्या दिशेने जात होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनच्या किमी क्रमांक 35.000 येथे दुपारी सुमारे 12.20 वाजता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर उलटला. त्यानंतर टँकरला आग लागली.https://maharashtramirror.com/ khopoli News
घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे तसेच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित यंत्रणांनी बचावकार्य सुरू केले.टँकरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी खोपोली पोलीस स्टेशन, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, बोरघाट टीएपी, आयआरबी पेट्रोलिंग पथक आणि हेल्प फाउंडेशन यांच्या पथकांनी संयुक्तपणे प्रयत्न केले. अखेर चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला पुढील उपचारासाठी लोकमान्य हॉस्पीटलच्या ॲम्बुलन्स मधून एमजीएम हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले.https://maharashtramirror.com/ khopoli News
दरम्यान, टँकरला लागलेली आग विझविण्यासाठी खोपोली नगरपरिषद तसेच ए. एम. एन. एस. कंपनीची फायर ब्रिगेड यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन पथकांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. आयआरबी पेट्रोलिंग पथकाने देखील घटनास्थळी वाहतूक व्यवस्थापन आणि मदतकार्य केले. टँकरमध्ये पाम तेल असल्याने परिस्थितीची सुरक्षितता लक्षात घेऊन हेल्प फौंडेशनचे केमिकल एक्स्पर्ट धनंजय गीध यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही केली. https://maharashtramirror.com/ khopoli News
अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मुंबई लेनवरील दोन लेनमधून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. अपघातग्रस्त टँकर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू आहे खोपोली पोलीस स्टेशन, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, खोपोली नगरपरिषद, ए. एम. एन. एस. कंपनीची फायर ब्रिगेड, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, हेल्प फाउंडेशन तसेच अन्य संबंधित यंत्रणांच्या समन्वयामुळे मोठी जीवितहानी टळली.



