देश-विदेशपुणेमुंबई

Delhi News: लोकशाही-सत्तेचा रणसंग्राम

Delhi News: सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला छावणीचे स्वरूप; हजारो अटकेत; दिपके, रांका, दास, केजरीवाल, ममता, तुषार गांधी यांना अटक; तरीही आंदोलक रस्त्यावर; पुणे, मुंबईतही पडसाद

Delhi News:नवी दिल्ली/मुंबई/पुणे: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदारयाद्यांच्या विशेष फेरतपासणीविरोधात ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) व विविध संघटनांनी पुकारलेल्या जंतरमंतर आंदोलनामुळे दिल्लीसह देशभरात अभूतपूर्व तणाव निर्माण झाला. दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला स्पष्ट परवानगी नाकारली असली, तरी आंदोलक आणि राजकीय नेते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने राजधानीत व विविध राज्यांत मोठी धरपकड पाहायला मिळाली.https://maharashtramirror.com/ Delhi News

देशव्यापी निदर्शने आणि मोठी धरपकड


दिल्लीत निदर्शने करण्यासाठी जमलेल्या आणि प्रवास करणाऱ्या ५ हजारांहून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके (ज्यांना विमानातूनच ताब्यात घेण्यात आले), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक प्रमुख राष्ट्रीय नेते, विद्यार्थी कार्यकर्ते व पत्रकारांचा समावेश आहे. दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाकडे मार्च काढणाऱ्या वकिलांनाही पोलिसांनी रोखले होते, मात्र सरन्यायाधीशांच्या हस्तक्षेपानांतर त्यांना सोडण्यात आले..https://maharashtramirror.com/ Delhi News

राजधानी छावणीत रूपांतरित व रेल्वे वाहतुकीवर परिणाम


आंदोलनाला रोखण्यासाठी प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलली. केंद्रीय निमलष्दद दल आणि सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण दिल्ली छावणीत बदलली आहे. मेट्रोचे ४५ हून अधिक स्टेशन बंद करणे, महत्त्वाचे रस्ते सील करणे आणि विविध राज्यांतून दिल्लीकडे जाणाऱ्या शेकडो रेल्वे गाड्या व आरक्षित तिकिटे रद्द करणे यांमुळे जनजीवन आणि प्रवाशांचे हाल झाले. लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याच्या अधिकारावर प्रशासनाकडून नको असलेले अंकुश लादले जात असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

या राष्ट्रीय आंदोलनाचे लोन महाराष्ट्रभर पसरले. दिल्ली आंदोलनासाठी निघालेल्या पुण्यातल्या कार्यकर्त्यांना मध्य प्रदेशातील इटारसी रेल्वे स्थानकावर पोलिसांनी ताब्यात घेतले. पुण्यातील लालमहालासमोर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच, दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात जमणाऱ्या निदर्शकांना व महिला कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतले. या तीव्र कारवाईमुळे राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळाले.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button