पुणे

वाद घालून जनगणना कामात अडथळा आणू नये: महापालिका

घोषित व अघोषित झोपडपट्टी क्षेत्रांमधील काही ठिकाणी प्रगणकांना जनगणनेच्या कामात मिळत नसल्याचे दिसून आले आहे

निलेश राऊत
पुणे: पुणे शहर महापालिका क्षेत्रात दिनांक १६/०५/२०२६ ते दि.१४/०६/२०२६ या कालावधीत जनगणना – २०२७ अंतर्गत प्रथम फेरीच्या क्षेत्र कामकाजाकरता प्रगट माहिती घेण्यासाठी घरांना भेटी देत आहेत. मात्र घोषित व अघोषित झोपडपट्टी क्षेत्रांमधील काही ठिकाणी निवासीधारक जनगणना प्रगणकांना गणनाघरांना क्रमांक देणे व जनगणने कामी माहिती घेणे बाबत सहकार्य करीत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सर्व झोपडपट्टीधारकांना कळविण्यात येते की, जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत जनगणनेचे कामकाज करण्यात येते. नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन सहकार्य करणे आवश्यक असल्याचे महापालिकेने आवाहन केले आहे.

सदर संकलित माहिती ही गोपनीय स्वरूपात ठेवण्यात येते. त्या अनुषंगाने प्रगणकांबरोबर वाद घालून जनगणना कामात अडथळा निर्माण करू नये. जनगणनेचे काम हे राष्ट्रीय स्वरूपाचे असून विहित मुदतीत पूर्ण करणे अनिवार्य आहे. तरी जनगणना – २०२७ च्या कामकाजामध्ये जनगणना प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करावे असे पुणे महापालिकेतर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button