Vrundavan News : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह शिगेला मथुरा-वृंदावनमध्ये लाखो भाविकांची गर्दी
Vrundavan News :वृंदावन – शुक्रवारी (दि. ४) देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जात आहे. भगवान श्रीकृष्णाचा ५२५३ वा जन्मोत्सव असल्याने मथुरा-वृंदावनपासून जगन्नाथ पुरी, द्वारका आणि देशातील विविध कृष्ण मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी, द्वारकेतील द्वारकाधीश मंदिर, दिल्लीतील इस्कॉन मंदिर तसेच जयपूरमधील गोविंद देवजी मंदिरात मंगला आरती करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Vrundavan News
भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेत गुरुवार रात्रीपासूनच देशभरातून भाविक दाखल होण्यास सुरुवात झाली. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मथुरा-वृंदावनसह संपूर्ण ब्रज मंडळात सुमारे पंच्याहत्तर लाख भाविक येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी असून, प्रशासनाकडून सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Vrundavan news
दरम्यान, जन्माष्टमीनिमित्त ओडिशातील जगन्नाथ पुरी येथील मुख्य मंदिर विशेष विधीसाठी सुमारे पाच तास बंद ठेवण्यात येणार आहे. या विशेष विधीदरम्यान भगवान जगन्नाथ आईचे रूप धारण करून श्रीकृष्णाला जन्म देतील, अशी धार्मिक परंपरा आहे.जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी श्री काशी विश्वनाथ मंदिरातून मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थानासाठी श्री लाडू गोपाळांसाठी खास भेटवस्तू पाठवण्यात आल्या. काशी आणि मथुरा यांच्यातील धार्मिक-सांस्कृतिक संबंध अधोरेखित करणारी ही परंपरा २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Vrundavan News
राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरातही जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मंदिर परिसरात एकवीस तोफांची सलामी देण्यात आली. नाथद्वारा येथे गेल्या ३५२ वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू असल्याचे सांगण्यात येते. देशभरातील मंदिरांमध्ये आरती, पूजा, भजन-कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी जन्माष्टमीचा उत्सव रंगला आहे.


