पुणेपिंपरी चिंचवड

Masur News : हणबरवाडीत शिवशौर्याचा जागर ! दारोदारी साकारले राजगड, रायगड अन् प्रतापगड

Masur News : मोबाईलला सुट्टी, हातात माती अन् मनात शिवराय! हणबरवाडीत दारोदारी उभे राहिले ऐतिहासिक गडकोट!

Masur News : मसूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे अतुलनीय शौर्य, पराक्रम, धाडस आणि स्वराज्यनिर्मितीचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हणबरवाडी (ता. कराड) येथे यंदाही दिवाळीनिमित्त भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे यंदा पाचवे वर्ष असून गावातील लहानग्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि मेहनतीतून दारोदारी राजगड, रायगड, प्रतापगड यांसह विविध ऐतिहासिक गडकोटांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण गावात शिवशौर्याचा जागर पाहायला मिळत आहे.https://maharashtramirror.com/ Masur News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न राहता तो मुलांच्या मनामनांत रुजावा, त्यांच्यामध्ये स्वाभिमान, धाडस, नेतृत्वगुण, चिकाटी आणि देशप्रेमाची भावना निर्माण व्हावी, या हेतूने ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मुलांनी मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून प्रत्यक्ष कृतीतून इतिहास जाणून घ्यावा, तसेच किल्ल्यांची रचना, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि महाराजांच्या गनिमी काव्याची माहिती समजून घ्यावी, यासाठी आयोजकांनी हा अभिनव उपक्रम सुरू ठेवला आहे. चित्रपट लेखक-दिग्दर्शक रामकुमार शेडगे, सातारा पोलीस दलातील सिद्धनाथ शेडगे, लता शेडगे आणि गोरखनाथ शेडगे यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रामकुमार शेडगे म्हणाले, आजच्या मोबाईलच्या युगात लहान मुले मोठ्या प्रमाणावर मोबाईलच्या आहारी जात आहेत. मोबाईलचे व्यसन त्यांच्या बालपणावर आणि सर्जनशीलतेवर परिणाम करत आहे. अशा परिस्थितीत मुलांना आपल्या गौरवशाली इतिहासाशी जोडणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, दूरदृष्टी, शौर्य आणि स्वराज्यनिर्मितीचा आदर्श मुलांसमोर ठेवून त्यांना प्रेरणा मिळावी, या विचारातून ही स्पर्धा सुरू केली आहे.https://maharashtramirror.com/ Masur News

सिद्धनाथ शेडगे म्हणाले, हणबरवाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला उजाळा देण्याचा आमचा यंदाही प्रामाणिक प्रयत्न आहे. किल्ले उभारताना मुलांना महाराजांचा इतिहास समजतो, त्यांच्यात एकजुटीची भावना निर्माण होते. पुढील पिढीने आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगावा आणि शिवविचारांचा वारसा जपावा, हीच या उपक्रमामागील भूमिका आहे. या स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या तसेच सहभागी स्पर्धकांचा भावबीजेच्या दिवशी (ता. ११) गौरव करण्यात येणार आहे. विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र तसेच शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले जाणार आहे. किल्ले स्पर्धेमुळे मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जवळून ओळख होत आहे. मुले स्वतः किल्ले तयार करताना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळतो. प्रत्येक घरातून शिवइतिहासाचा हा जागर घडावा आणि ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत अशीच सुरू राहावी, हीच आमची इच्छा आहे. लता शेडगे ( किल्ले स्पर्धा आयोजक )

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button