Pune Crime : घरफोडी अन् वर्कशॉपमधील तांब्याच्या मालाची चोरी
Pune Crime : वारजे आणि नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घरफोडी आणि चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घराचा कडी-कोयंडा तोडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवण्यात आले, तर नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्कशॉपचे कुलूप तोडून तांब्याचा मौल्यवान माल पळवल्याची घटना घडली आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
वारजे परिसरात घरफोडी; १.७४ लाखांचे सोने लांबवले
वारजे परिसरात घरफोडी करून चोरट्यांनी १.७४ लाखांचे सोने लांबवले. या प्रकरणी ३२ वर्षीय फिर्यादींनी वारजे-माळवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ही घरफोडी शिवणे भागातील डांगट पाटील नगर येथील ‘साई श्रद्धा रेसिडेन्सी’मध्ये घडली. फिर्यादी हे २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता आपल्या फ्लॅट क्र. २०१ ला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सातच्यादरम्यान अज्ञात चोरट्याने बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले १ लाख ७४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, कलम ३३१(३) आणि ३०५ अंतर्गत अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune Crime
धायरीतील वर्कशॉपमधून ४.४७ लाखांचा तांब्याचा माल चोरीला
दुसऱ्या घटनेत, नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धायरी परिसरात चोरट्यांनी एका बंद वर्कशॉपला लक्ष्य केले. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी अकराच्या सुमारास धायरी येथील सर्व्हे नं. १८०/११, कॅनॉलजवळ असलेलया एका बंद वर्कशॉपचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आणि वर्कशॉपमध्ये ठेवलेला तांब्याचा आणि इतर धातूंचा मिळून तब्बल ४ लाख ४७ हजार ५०० रुपये किमतीचा माल लांबवला. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, कलम ३०५ व ३३१(१)(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत पुढील तपास करत आहेत.


