पुणे

PUNE NEWS : आषाढी वारीसाठी माऊलींचा अत्याधुनिक रथ सज्ज

वजन एक टनाने कमी, आठ सीसीटीव्हीही कॅमेऱ्यांची सुविधा

पुणे, PUNE NEWS: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यंदा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नव्या आणि आकर्षक रथासह पार पडणार आहे. आळंदीजवळील चिंबळी येथे तयार होत असलेला हा नवीन रथ वजनाने हलका, सुरक्षित आणि भाविकांसाठी अधिक सोयीस्कर असल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे यांनी दिली. PUNE NEWS

यापूर्वीचा चांदीचा रथ सुमारे अडीच टन वजनाचा असल्याने तो ओढताना बैलांवर मोठा ताण येत होता. ही बाब लक्षात घेऊन नव्या रथाचे वजन सुमारे दीड टन ठेवण्यात आले असून, म्हणजेच जवळपास एक टनाने वजन कमी करण्यात आले आहे. रथाची उंचीही कमी करण्यात आली असून, त्यामुळे तो अधिक संतुलित आणि सहजपणे ओढता येणार आहे. PUNE NEWS

डीआरडीओ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अष्टेकर ज्वेलर्स यांच्या सहकार्याने रथावर सिल्व्हर इलेक्ट्रोप्लेटिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. अत्याधुनिक बेअरिंग आणि कपलिंग प्रणालीचा वापर तसेच बॅटरीची गरज नसलेली रचना यामुळे रथ अधिक सुलभपणे चालणार आहे. सुमारे २० ते २५ लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेला हा रथ भाविक, बैल किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने सहज ओढू शकतील. वारीपूर्वी रथाची प्रत्यक्ष चाचणीही घेतली जाणार आहे. PUNE NEWS

नव्या रथावर फायबरचे आकर्षक स्ट्रक्चर असून त्यावर चांदीचे इलेक्ट्रोप्लेटिंग करण्यात आले आहे. आठ सुबक खांब, पारंपरिक चांदीचे नक्षीकाम, तसेच गरुड आणि हनुमान यांची शिल्पे रथाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. रथाच्या अग्रभागी माऊलींची मूर्ती, सूर्य, गरुड, हनुमान तसेच जय-विजय यांच्या प्रतिकृती विराजमान असतील. PUNE NEWS

सुरक्षेच्या दृष्टीने या रथावर आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. येत्या ८ जुलै रोजी आळंदीहून होणाऱ्या प्रस्थान सोहळ्यापूर्वी हा अत्याधुनिक, सुरक्षित आणि देखणा रथ भाविकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

PUNE NEWS

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button