भिडेवाडा : छगन भुजबळ यांची भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाला भेट; स्मारकाच्या कामाचा घेतला आढावा
भिडेवाडा : छगन भुजबळ यांची भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाला भेट

भिडेवाडा : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक कार्याचे जतन करण्यासाठी दर्जेदार कामाच्या सूचना
भिडेवाडा : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेल्या ऐतिहासिक भिडेवाडा येथे उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी भेट देऊन स्मारकाच्या कामाची पाहणी केली.
PCMC : शौचालयांमध्ये परिवर्तन; पीसीएमसीच्या नव्या धोरणाला स्थायी समितीची मंजुरी

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी स्मारकाच्या उभारणीची सद्यस्थिती, वास्तुरचना, संवर्धनाचे काम तसेच विविध टप्प्यांतील प्रगतीचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांनी स्मारकाच्या कामाची माहिती देत आतापर्यंत झालेली प्रगती, सुरू असलेली कामे आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली.(भिडेवाडा )
KANGANA RANAUT GEN Z CONTROVERSY : कंगना राणौत यांच्या कथित वक्तव्याविरोधात गुलाबो गँग आक्रमक; पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय

भिडेवाडा हे भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे स्थान मानले जाते. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्या ऐतिहासिक कार्यामुळे भिडेवाड्याला सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणास्थान म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या पार्श्वभूमीवर भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम ऐतिहासिक वारसा जपत, दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. स्मारक उभारताना त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाला प्राधान्य देणे, वास्तूचे संवर्धन योग्य पद्धतीने करणे आणि भविष्यात नागरिकांना या ठिकाणातून प्रेरणा मिळेल, अशा स्वरूपाचे काम करण्यावर त्यांनी भर दिला.(भिडेवाडा )

यावेळी त्यांनी स्मारकाच्या कामामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, तसेच कामाची गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. भिडेवाडा हे केवळ एक वास्तू नसून सामाजिक समतेचा, शिक्षणाचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारे महत्त्वपूर्ण केंद्र असल्याचे त्यांनी नमूद केले.(भिडेवाडा )
या पाहणी दौऱ्यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता बिपीन शिंदे, सार्वजनिक बांधकाम (इलेक्ट्रिकल) विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर, वास्तुविशारद धनंजय साळकर, उपायुक्त अविनाश सकपाळ, उपायुक्त माधव जगताप, उपायुक्त तुषार बाबर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीशिक्षण, सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या स्मारकामुळे पुण्याच्या सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाला अधिक महत्त्व प्राप्त होणार असून, देशभरातील नागरिकांसाठी हे एक प्रेरणास्थान ठरणार आहे.(भिडेवाडा )
स्मारकाच्या कामाला गती देऊन ते दर्जेदार स्वरूपात पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही सुरू असून, या प्रकल्पाकडे सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा उपक्रम म्हणून पाहिले जात आहे.



