महाराष्ट्रपुणे

Pune News: अंमली पदार्थमुक्त समाजासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे आवाहन


Pune News : पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित “श्री मोरया पुरस्कार – २०२५” पारितोषिक वितरण सोहळा बुधावारी (दि.२) आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.https://maharashtramirror.com/ Pune News
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्था राखणे, नियमांचे पालन करणे आणि सामाजिक प्रबोधन करणाऱ्या मंडळांच्या कार्याचा गौरव करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) डॉ. बसवराज तेली यांच्यासह पोलीस उपआयुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक आणि सुमारे हजार गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.https://maharashtramirror.com/ Pune News
‘श्री मोरया पुरस्कार – २०२५’ विजेते
उत्कृष्ट देखावे आणि शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी एकूण चौदा मंडळांना पारितोषिके व ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.
१. पोलीस आयुक्तालय स्तर (मुख्य पुरस्कार)
• प्रथम क्रमांक (श्री मोरया फिरता करंडक): मयूर मित्र मंडळ, मार्केटयार्ड, चाकण
• द्वितीय क्रमांक: सुवर्ण मित्र मंडळ (क्रीडा व कला मंच), पिंपरीगाव
• तृतीय क्रमांक: सिद्धीचा गणपती महिला मंडळ, बावधन
२. परिमंडळनिहाय विजेते
• परिमंडळ – १:
o प्रथम: एस.के.एफ. गणेश उत्सव मंडळ, चिंचवड
o द्वितीय: भैरवनाथ मित्र मंडळ, पिंपळे गुरव, सांगवी
o तृतीय: स्वराज्य मित्र मंडळ, संत तुकाराम नगर, पिंपरी
• परिमंडळ – २:
o प्रथम: सम्राट मित्र मंडळ, थेरगाव
o द्वितीय: शिवतेज मित्र मंडळ, उर्स शिरगाव
o तृतीय: गणेश तरुण मित्र मंडळ, तळेगाव दाभाडे
• परिमंडळ – ३:
o प्रथम: नवयुग मित्र मंडळ, चाकण
o द्वितीय: जय गणेश प्रतिष्ठान, आळंदी
o तृतीय: जय बजरंग मित्र मंडळ, चिखली
३. विशेष पुरस्कार
• आदर्श देखावा पुरस्कार: विशाल मित्र मंडळ, थेरगाव-वाकड
• आदर्श मिरवणूक पुरस्कार: श्री शिवछत्रपती मित्र मंडळ, रावेत
प्रमुख आवाहने व मार्गदर्शक सूचना
• अंमली पदार्थविरोधी मोहीम: तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी गणेश मंडळांनी आपल्या देखाव्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर प्रभावी जनजागृती करावी, असे आवाहन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले. तसेच सायबर सुरक्षा आणि वाहतूक नियमांवरही देखावे साकारण्याचे सुचवले.
• पर्यावरणपूरक उत्सव: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व सजावटीचा वापर करण्याचे आणि निर्माल्य व्यवस्थापनास प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
• आगामी गणेशोत्सव २०२६ नियोजन: कार्यक्रमादरम्यान मंडळांना ऑनलाईन नोंदणी (सुधीर बोराडे), पोलीस परवानग्या (वरिष्ठ निरीक्षक हेमंत कदम) आणि विद्युत परवानग्यांबाबत (ज्ञानदेव तरंगे) सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्यालयाचे पोलीस उपआयुक्त गणेश इंगळे यांनी मानले.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button