Pune Accident : कोंढवा येथे भरधाव टँकरच्या धडकेत १९ वर्षीय युवकाचा मृत्यू
टँकर चालक ताब्यात; क्लाउड नाईन, आनंदवन सोसायटीच्या परिसरात झाला अपघात; मृत दुचाकीस्वाराचे नांव आरिफ शेख
पुणे, एप्रिल ६, महाराष्ट्र मिरर : शहरातील भरधाव टँकर/डंपर चालकाने आणखी एका दुचाकीस्वाराला धडक देऊन त्याला गंभीर जखमी केल्याची घटना कोंढवा येथे रविवारी संध्याकाळी ५ वाजता घडली. त्यात एका १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे.
हा अपघात मोहम्मद वाडीच्या क्लाउड नाईन, आनंदवन सोसायटीच्या परिसरात झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, टँकर/डंपरने धडक दिल्याने हा अपघात झाला. संबंधित चालकाला ताब्यात घेऊन काळेपडळ पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
संबंधित टँकर चालकाचे नांव रवींद्र भीमराव दनाने, वय ३४, असून त्याने भरधाव वेगाने टँकर (MH43-BG- 6210) चालवून दुचाकी TVS जुपिटर (MH12QZ5521) चालवत असलेला दुचाकीस्वार आरिफ शेख, वय १९, यास धडक देऊन गंभीर जखमी केले. जखमी इसमास रुबी हॉस्पिटल, वानवडी येथे रवाना केले होते. डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. पोलिसांनी टँकर चालकास पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे, असे काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले. pune crime kondhwa accident
19-Year-Old Youth Dies After Being Hit by Speeding Tanker in Kondhwa


