पुणे

MH 12 पुण्याची ऐतिहासिक ओळख कायम राहणार?

MH 12 मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दिल्लीत भेट; सकारात्मक निर्णयाची ग्वाही

पुणे, महाराष्ट्र मिरर

MH 12 पुणेकरांच्या अस्मितेशी आणि शहराच्या संस्कृतीशी थेट जोडलेला ‘MH 12’ हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (RTO) वाहन नोंदणी क्रमांक कायम राहावा, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पुण्याच्या या ऐतिहासिक ओळखीला धक्का लावू नये, अशी आग्रही भूमिका मांडली, ज्यावर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, असे स्पष्ट केले आहे. mh 12 rto code murlidhar mohol pune

PMC: आयुक्तांची खुर्ची थोडक्यात वाचली; आता दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

पुणे शहर आणि परिसरामध्ये गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या अभूतपूर्व प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पुणे आरटीओ मधील वाहन नोंदणीची ‘MH 12 ZZ’ ही अखेरची मालिका (Series) सध्या सुरू आहे. ही शेवटची मालिका संपत आल्यामुळे आणि यापुढील पर्यायी क्रमांकांच्या तांत्रिक रचनेबाबत प्रशासकीय पातळीवर विचार सुरू झाल्यामुळे, पुणेकरांचा लाडका ‘एम एच १२ हा कोड इतिहासजमा होऊन बदलला जाणार का, अशी चिंता आणि चर्चा संपूर्ण पुणेकरांमध्ये निर्माण झाली होती.

PMC : महामेट्रोचा पुणे मनपाला लाखोंचा चुना? परवानगीशिवाय मेट्रो डब्यांवर जाहिराती

हीच बाब गांभीर्याने घेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि पुणेकरांच्या भावना त्यांच्या दरबारात मांडल्या. “पुणेकरांच्या भावना आणि अस्मितेशी जोडलेला ‘MH 12’ हा आरटीओ कोड कायम राहावा, हीच आमची आणि तमाम पुणेकरांची भूमिका आहे. ही भावना मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मांडली असून, त्यांनी याबाबत तातडीने योग्य त्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही दिली आहे. पुण्याची शान आणि अभिमान असलेला ‘MH 12’ कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अशी भावन त्यांनी यावेळी व्यक्त केली.

PMC : महामेट्रोचा पुणे मनपाला लाखोंचा चुना? परवानगीशिवाय मेट्रो डब्यांवर जाहिराती

PMC: आयुक्तांची खुर्ची थोडक्यात वाचली; आता दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणी लक्ष घालून सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिल्याने पुणेकर नागरिकांमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. वाहन नोंदणीच्या आगामी नव्या मालिका सुरू होत असतानाही ‘MH 12’ ही पुण्याची खास ओळख कायम राहण्याबाबतचा मार्ग आता सुकर झाला असून पुणेकरांनी या घडामोडीचे स्वागत केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button