PUNE NEWS : भटके विमुक्त बांधवांना जातीच्या दाखल्याचे वितरण

जेजुरीत शिबिराचे आयोजन
पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: पुरंदर तालुक्यातील रामोशी, बेरड, बेडर समाजासह भटके विमुक्त जाती-जमातीतील नागरिकांना तहसीलदार विक्रम रजपूत यांच्या उपस्थितीत मोफत जातीच्या दाखल्याचे वितरण करण्यात आले.PUNE NEWS

जय मल्हार क्रांती संघटना, पुरंदर आणि सासवड-पुरंदर तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. ३०) जेजुरी येथील मल्हार नाट्यगृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.PUNE NEWS
या शिबिराच्या माध्यमातून समाजातील नागरिकांना जातीचा दाखला मिळविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी भटके विमुक्त समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय प्रश्नांवर मार्गदर्शन केले. समाजातील प्रत्येक पात्र नागरिकाला आवश्यक शासकीय कागदपत्रे सहज उपलब्ध व्हावीत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.PUNE NEWS
या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून भविष्यातही अशाच लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.PUNE NEWS
कार्यक्रमास जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक दौलत नाना शितोळे, जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, चंद्रकांत खोमणे, नगरसेवक रोहित खोमणे, संघटनेचे प्रवक्ते गंगाराम जाधव, पुरंदर तालुका अध्यक्ष विकास भांडवलकर, भाजप भटके विमुक्त आघाडीचे पुरंदर तालुका अध्यक्ष राहुल काळे यांच्यासह जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुरंदर तालुक्यातील सुमारे ८० गावांच्या प्रतिनिधीसह लाभार्थी उपस्थित होते.
PUNE NEWS


