क्राईम न्यूजपुणे

Pune Crime : आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या नावाने महिलेची बावीस लाखांची फसवणूक

Pune Crime :चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : मॅट्रिमॉनी ॲपवरून ओळख करून आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या नावाने एका महिलेला तब्बल २१ लाख ८९ हजार ५० रुपयांना गंडवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जनवाडी येथील ३४ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime

पोलीस माहितीनुसार,’निकाह फॉरेव्हर मॅट्रिमनी’ या ॲपद्वारे पीडित महिलेची दि. ८ ते २५ ऑगस्ट दरम्यान एका अज्ञात व्यक्तीशी ओळख झाली होती. आरोपीने आपण फ्रान्समध्ये राहत असल्याचे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला आणि तिच्या भेटीसाठी पुण्यात येत असल्याचे भासवले.काही दिवसांनी आरोपीने फोन करून, दिल्ली विमानतळावर कस्टम आणि विमानतळ प्राधिकरणाने त्याला पकडल्याचे सांगितले. त्याच्याकडे ८ हजार युरो रोख रक्कम असून त्याबाबतची वैध कागदपत्रे नसल्याचा बनाव त्याने केला.https://maharashtramirror.com/ Pune Crime
त्यानंतर आरोपीने व्हिसा कागदपत्रे क्लिअरन्स, तिकीट बुकिंग, बँक अधिकारी फी आणि करन्सी कन्व्हर्जनच्या नावाखाली तक्रारदार महिलेला विविध खात्यांवर पैसे भरण्यास भाग पाडले. वेळोवेळी मिळून आरोपीने महिलेकडून तब्बल २१ लाख ८९ हजार ५० रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button