पुणे

Pune News : २३ ऑक्टोबरला आठवडे बाजार राहणार बंद

Pune News :पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रमांतर्गत शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, तसेच मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी पुणे जिल्ह्यातील संबंधित गावांमध्ये आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र निश्चित केलेल्या गावांतील आठवडे बाजार बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश दिले आहेत.
ज्या गावांमध्ये आठवडे बाजार बंद राहणार आहेत, त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील मौजे पारगावतर्फे असवसरी बुद्रुक व घेडेगाव, इंदापूर तालुक्यातील मौजे बावडा, खेड तालुक्यातील मौजे राजगुरुनगर आणि बारामती तालुक्यातील मौजे लोणीभापकर या गावांचा समावेश आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित गावांतील व्यापारी, बाजार समित्या, ग्रामपंचायती आणि नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button