पुणे

Pune News : मला तर ट्यूशनच घ्यावी लागेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune News पुणे : सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना बापट यांच्या शुद्ध मराठी भाषेचे कौतुक करत त्यांना मिश्किल टोलाही लगावला आहे. फडणवीस म्हणाले, “बापट यांच्यासारखी भाषा बोलायला मला तर ट्यूशनच घ्यावी लागेल! त्यांची मराठी सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. मराठी भाषेच्या शुद्धतेचा एक नमुनाच त्यांच्या बोलण्यातून पाहायला मिळतो. त्यांची शुद्ध आणि सुंदर मराठी भाषा ऐकून आपल्याला खूप आनंद होतो. परंतु आपले विचार मांडताना त्याचा इतरांना त्रास होणार नाही आणि ते मुद्दे सर्वसमावेशक व्हावेत’’ असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, बापटांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करत कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाईचे आश्वासन दिले. तसेच सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि नागरिकांना त्रास न देता साजरे व्हावेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button