Pune News : नियमांचे पालन करत व्यवसायाची संधी द्यावी
Pune News : पुणे जिल्हा साऊंड, लाईट, जनरेटर ओनर्स असोसिएशनची मागणी
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर: आगामी गणेशोत्सवासाठी साउंड आणि लाईट व्यावसायिकांना प्रशासनाकडे नियमांचे पालन करत व्यवसाय करण्याची संधी द्यावी. नियमांमुळे व्यवसायावर परिणाम होऊन उपासमारीची वेळ येऊ नये, अशी मागणी पुणे जिल्हा साऊंड, लाईट, जनरेटर ओनर्स असोसिएशनने नवी पेठेतील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष गणेश काळभोर, उपाध्यक्ष सागर सुतार, कार्याध्यक्ष ओंकार पडवळ, सल्लागार मोहित पालेशा आणि रिपब्लिकन परिवर्तन पँथरचे गजेंद्र प्रकाश मोरे उपस्थित होते.https://maharashtramirror.com/ Pune News
आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि साऊंड सिस्टीमचा मुद्दा तापलेला असताना व्यावसायिकांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आम्ही प्रशासनाने निश्चित केलेल्या सर्व ध्वनीमर्यादा, वेळेचे नियम आणि न्यायालयीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास पूर्णपणे तयार आहोत. मात्र, साऊंड सिस्टीमवर पूर्णपणे बंदी घालून किंवा कडक निर्बंध लादून आमच्यावर उपासमारीची वेळ आणू नका,https://maharashtramirror.com/ Pune News
वर्षभरातील सर्व सण, उत्सव आणि कार्यक्रमांसाठी प्रशासनाने कायमस्वरूपी एकच नियमावली तयार करावी, अशी मागणी करत केवळ चार टॉप आणि चार बेस वापरणे, लेझर लाईट व प्रेशर बेसवर बंदी पाळणे आणि मिरवणुकीत अश्लील गाणी न वाजवणे या अटींना असोसिएशनने पाठिंबा दर्शवला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
आवाज मर्यादेत ठेवण्याचे लेखी आश्वासन देणाऱ्या मंडळांचे बुकिंग यंदा घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, परराज्यातून साऊंड सिस्टीम न मागवता स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य द्यावे, अशी विनंती मंडळांना करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
गणेश काळभोर म्हणाले, अति तीव्र आवाज, प्लास्मा व साऊंडच्या भिंतींमुळे होणाऱ्या स्पर्धेचा नागरिकांसह बालके आणि रूग्णांना त्रास होतो. त्यामुळे आम्ही नियमांच्या चौकटीत राहून व्यवसाय करण्यास तयार आहोत. दरवर्षी या काळात २० ते २५ लाखांचा आर्थिक व्यवहार होणाऱ्या या व्यवसायात यंदा ५० हजार रुपये मिळणेही कठीण झाले आहे. साऊंड बंद केल्यास हजारो कुटुंबांचा रोजगार धोक्यात येईल, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. https://maharashtramirror.com/ Pune News
प्रशासनाने या निर्णयावर पुनर्विचार न केल्यास गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्रात मोर्चा काढण्याचा इशारा रिपब्लिकन परिवर्तन पँथरचे गजेंद्र मोरे यांनी दिला आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत हा मुद्दा मांडला. त्यानंतर ध्वनी प्रदूषणाविरोधातील मोहीम अधिक तीव्र झाली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ध्वनी प्रदूषणाचे आणि न्यायालयाचे नियम मोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.


