Delhi news : व्यायामामुळे नैराश्याचा अनुवंशिक धोका कमी होण्यास मदत
Delhi news : नवी दिल्ली : नियमित शारीरिक व्यायाम आणि सक्रिय जीवनशैलीमुळे नैराश्याचा अनुवंशिक धोका कमी होण्यास मदत होऊ शकते, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, अनुवंशिकदृष्ट्या नैराश्याचा धोका अधिक असलेल्या व्यक्तींनाही नियमित व्यायामाचा फायदा होऊ शकतो.https://maharashtramirror.com/ Delhi news
अमेरिकेतील ‘ऑल ऑफ अस’ (All of Us) या संशोधन कार्यक्रमात सहभागी झालेल्या २३ हजार ५१७ लोकांच्या माहितीचे संशोधकांनी विश्लेषण केले. यामध्ये सहभागींच्या वेअरबल्स उपकरणांद्वारे नोंदविण्यात आलेली दैनंदिन पावलांची संख्या आणि शारीरिक हालचालींसाठी दिलेला वेळ यांचा अभ्यास करण्यात आला.https://maharashtramirror.com/ Delhi news
या विश्लेषणातून एक महत्त्वपूर्ण बाब समोर आली. जे प्रौढ अधिक शारीरिकदृष्ट्या सक्रिय होते, त्यांच्यामध्ये अनुवंशिक धोका आणि नैराश्याची तीव्रता यांच्यातील संबंध तुलनेने कमी असल्याचे आढळले. हा अभ्यास ‘नेचर मेंटल हेल्थ’ या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटीतील सहाय्यक प्राध्यापकांच्या मते, नैराश्य हे जगभरातील अपंगत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. सध्या वैयक्तिकृत उपचारपद्धतींवर भर दिला जात असताना, व्यक्तीचा अनुवंशिक धोका समजून घेणे महत्त्वाचे ठरत आहे. त्यातून संबंधित व्यक्तीला जीवनशैलीतील बदल, विशेषतः व्यायामाचे महत्त्व समजावून सांगण्यास मदत होऊ शकते.
व्यायामामुळे मेंदूची लवचिकता वाढते, स्मृती आणि भावनांशी संबंधित हिप्पोकॅम्पस या मेंदूच्या भागाचे कार्य सुधारते तसेच शरीरातील दाह कमी होण्यास मदत होते. नैराश्याचा अनुवंशिक धोका असलेल्या व्यक्तींमध्ये याच कार्यप्रणालींवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. याशिवाय, नियमित व्यायामामुळे तणावाचा सामना करण्याची शरीराची क्षमता सुधारते. त्यामुळे अनुवंशिकदृष्ट्या नैराश्याचा धोका असलेल्या व्यक्तींसाठी नियमित शारीरिक हालचाल विशेष फायदेशीर ठरू शकते, असे संशोधकांनी नमूद केले आहे.



