Pune Crime : डिलिव्हरी बॉयला लुटणारे सराईत अटकेत; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
डिलिव्हरी बॉयला लुटणारे सराईत अटकेत; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Pune Crime : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची कामगिरी
पिंपरी, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : झेप्टो डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून त्याला लुटणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने सहा सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि मोबाईल असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.सुरज शंकर चलवादी (वय २४), विराज उर्फ सनी युवराज हिरवे (वय १९),
ईसाक राजू काजापुरम (वय २८, तिघे रा. मामुर्डी), दिपक दयानंद भंडगे (वय २४, रा. नऱ्हे, मूळ लातूर), अविनाश अरुण वानखेडे (वय २६, रा. नऱ्हे, मूळ वेल्हे), प्रथमेश उर्फ प्रतिक हरीभाऊ कंक (वय २७, रा. पनवेल) अशी आरोपींची नावे आहेत.https://maharashtramirror.com/ Pune Crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डिलिव्हरी बॉय २१ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास लोढा सोसायटी, गहुंजे येथे ऑर्डर देऊन झेप्टो स्टोअरच्या समोरून गहुंजे स्टेडियम रस्त्याने जात होता. यावेळी आरोपींनी रिक्षा आडवी मारून फिर्यादीला जबरदस्तीने रिक्षात डांबले आणि त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला मामुर्डी येथील स्मशानभूमीजवळील मैदानात नेऊन जबर मारहाण करत, त्याच्याजवळील ९० हजार रुपयांची रोकड लुटून पोबारा केला. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.सदरची घटना घडल्यानंतर आरोपींविषयी कोणताही प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नव्हता. हे आव्हान स्वीकारत युनिट-४ च्या पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिल सहा संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही दरोडा व जबरी चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी त्यांना तळेगाव दाभाडे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहीदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले व गुन्हे शाखा युनिट-४ च्या अंमलदारांनी पार पाडली.


