क्राईम न्यूजपुणे

CRIME NEWS : बारामतीत ५५ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

दत्त ट्रेडर्सवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा; एकावर गुन्हा दाखल

पुणे CRIME NEWS: पुणे जिल्ह्यातील बारामती शहराच्या हद्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमजवळ असलेल्या ‘दत्त ट्रेडर्स’ या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक छापा टाकून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला तब्बल ५५ हजार २४४ रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला, तंबाखू आणि गुटखा असा प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे.CRIME NEWS

याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये अन्न सुरक्षा कायद्यान्वये आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार एका संशयितावर गुन्हा नोंदवला आहे.

बारामती शहरात छुप्या पद्धतीने प्रतिबंधित गुटख्याची विक्री आणि साठवणूक केली जात असल्याचे या कारवाईवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.CRIME NEWS

या धडक कारवाईप्रकरणी अन्न व औषध प्रशासन (पुणे) विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. दिगंबरराव (वय ४१ वर्षे, रा. मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड, पुणे) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी संदीप दत्तात्रय लक्ष्मण शिंदे गायकवाड (वय ५१ वर्षे, रा. मातोश्री निवास, वसंतनगर, बारामती, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६(२)(प), २६(२)(पअ), सहवाचन कलम २७(३)(म), कलम ३(प)(अ) व कलम ३०(२)(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान, बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमजवळ असलेल्या ‘दत्त ट्रेडर्स’ या दुकानात बेकायदेशीररीत्या प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अन्नसुरक्षा पथकाने गेल्या २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास दत्त ट्रेडर्सवर अचानक छापा टाकला.
या छाप्यात आरोपी संदीप शिंदे गायकवाड हा मानवी आरोग्यास अत्यंत हानिकारक असलेल्या आणि शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित पानमसाला, गुटखा आणि तंबाखूची बेकायदेशीर साठवणूक व विक्री करताना रंगेहाथ आढळून आला. पथकाने दुकानातून एकूण ५५ हजार २४४ रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा सुगंधित पानमसाला, तंबाखू आणि गुटखा जप्त केला. हा सर्व साठा जप्त करून कायदेशीर नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला.CRIME NEWS

अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी आणि प्रयोगशाळेचा पडताळणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर बुधवार (ता. १०) जून २०२६ रोजी बारामती शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शिंदे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

CRIME NEWS

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button