Pune News : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण
Pune News :पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील गोंधळ, पेपरफुटी आणि विविध प्रलंबित मागण्यांवरून पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी एमपीएससी अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी लावून धरली असतानाच, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावर कायदेशीर आणि प्रशासकीय बाजू स्पष्ट केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

एमपीएससी अध्यक्षांनी राजीनामा दिला असला किंवा त्यांच्यावर आरोप असले तरी संवैधानिक पदानुसार अध्यक्षांना थेट पदावरून हटवण्याचा किंवा निलंबित करण्याचा अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नसतो, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ Pune News
पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, लोकसेवा आयोग ही एक स्वायत्त आणि घटनात्मक संस्था आहे. भारतीय संविधानातील तरतुदींनुसार आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती आणि त्यांना पदावरून दूर करण्याची एक निश्चित कायदेशीर प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री परस्पर अध्यक्षांना पदावरून काढून टाकू शकत नाहीत, या वस्तुस्थितीची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे.
दरम्यान, मोहोळ यांनी या आंदोलनाला राजकीय वळण दिले जात असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर केला. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख आणि रास्त मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली होती. विद्यार्थी प्रतिनिधींनी त्यावर समाधान व्यक्त करत आंदोलन मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पुण्यात परतल्यानंतर काही राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे आंदोलन पुन्हा सुरू ठेवण्यात आले, असा दावा मोहोळ यांनी केला. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजण्याचे काम विरोधकांकडून सुरू असून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अशा राजकारणापासून सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.


