महाराष्ट्र

PUNE NEWS : पुरंदरच्या फळ बाजारात जगप्रसिद्ध सीताफळाची एंट्री

१,००० ते २,००० प्रति क्रेट बाजारभाव

पुणे, महाराष्ट्र मिरर, प्रतिनिधी : आपल्या दर्जेदार चवीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या पुरंदरच्या सीताफळाची बाजारपेठेत एंट्री झाली आहे, मात्र यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे या पिकाला मोठा फटका बसला आहे. जून महिना संपत आला तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने सीताफळ बागा अडचणीत आल्या आहेत.

पावसाअभावी यावर्षी सीताफळाची आवक कमालीची घटली असून, बाजारात येणाऱ्या फळांचा आकार लहान आहे आणि अपेक्षित गुणवत्ताही दिसून येत नाही. सध्या बाजारपेठेत दररोज अवघी ४० ते ५० क्रेट्स एवढीच संथ आवक सुरू आहे.

बाजारभाव प्रचंड वाढण्याची शक्यता
गुणवत्तेत घसरण झाल्यामुळे सध्या सीताफळाला १,००० ते २,००० रुपये प्रति क्रेट इतका बाजारभाव मिळत आहे. दरम्यान, आगामी काळातही जर पाऊस पडला नाही, तर आवक आणखी घटून सीताफळांचे बाजारभाव प्रचंड वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. पाऊस लांबल्याने पुरंदरचे शेतकरी चिंतेत ग्रासले असून आता सर्वांचे डोळे पावसाकडे लागले आहेत.

World-famous custard apples arrive at the Purandar fruit market.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button