महाराष्ट्र

Parth Pawar : पवार कुटुंबात पुन्हा सनई-चौघडे

Parth Pawar : खासदार पार्थ पवार आणि कायनात धार यांचा २९ जुलैला पुण्यात साखरपुडा!

Parth Pawar : राजकीय वर्तुळात नेहमी चर्चेत असणारे स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवार ( parth pawar ) यंदा वैयक्तीत कारणास्तव चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा येत्या 29 जुलै रोजी पुण्यात पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सोहळ्याच्या तयारीला दोन्ही कुटुंबांनी सुरुवात केल्याचे सांगितले जात असून, राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ( parth pawar engagement kainat dhar )

साखरपुड्याच्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही पार्थ पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हा समारंभ कुटुंबीय आणि निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे समजते. मात्र, विवाह सोहळ्याच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ( parth pawar )

Crime : पालखी सोहळ्यात दागिने पळवणारी महिला टोळी जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

कोण आहेत कायनात धार?
अधिकच्या माहितीनुसार, कायनात धार या मूळच्या जम्मू-काश्मीरमधील असून सध्या त्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. पवार कुटुंबाशी त्यांचे जुने कौटुंबिक संबंध असल्याचे सांगितले जाते. गेल्या काही महिन्यांत त्या पार्थ पवार यांच्यासोबत विविध कार्यक्रमांमध्ये दिसून आल्याने त्यांच्या नात्याबाबत चर्चा रंगू लागली होती. ( parth pawar )

काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार आणि कायनात धार यांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेतले होते. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दोघांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यातही दोघांची उपस्थिती चर्चेत

अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती यांच्या विवाह सोहळ्यात पार्थ पवार यांची उपस्थिती विशेष चर्चेत राहिली होती. त्या वेळी कायनात धार देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. ( parth pawar )

Pune News : अधिकारी गेले अन् काही तासांतच पुन्हा सांडपाणी रस्त्यावर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह दोघांची उपस्थिती पाहून त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना अधिक उधाण आले होते. आता समोर आलेल्या साखरपुड्याच्या वृत्तामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले असून, आगामी काळात विवाह सोहळ्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

View this post on Instagram

A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button