क्राईम न्यूजपुणे

Pune Crime : पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बसमधून ५.६० लाखांचे दागिने लांबवले

Pune Crime : जेजुरीतील हॉटेलसमोरील घटना

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे-पंढरपूर मार्गाने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसमधून अज्ञात चोरट्याने ५ लाख ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग पळवल्याची घटना घडली आहे. जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकुर्डे गावाजवळ असलेल्या एका हॉटेलसमोर बस थांबली असताना हा प्रकार घडला.https://maharashtramirror.com/ Pune Crime

चहा-पाण्यासाठी उतरले अन् बॅगेतून सोने गायब

देहू रोड (विकास नगर, ता. हवेली) येथील रहिवासी मनीषा बापूसाहेब पाटील (वय ५१) या आपली सून क्रांती हिच्यासह २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:१५ च्या सुमारास पंढरपूर येथे जेवणाच्या कार्यक्रमासाठी निघाल्या होत्या. त्यांनी वल्लभनगर ते पंढरपूर या एसटी बसने प्रवास सुरू केला होता. दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास साकुर्डे गावच्या हद्दीतील ‘हॉटेल आईसाहेब’समोर जेवणाकरिता बस थांबली असता मनीषा पाटील आणि त्यांची सून चहा-पाण्यासाठी बसमधून खाली उतरल्या होत्या. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात भामट्याने त्यांच्या बसमधील बॅगेत ठेवलेले ५ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अत्यंत लबाडीने चोरून नेले.https://maharashtramirror.com/ Pune Crime
चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये अडीच लाख रुपये किमतीचे ५ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, २ लाख १५ हजार रुपये किमतीचे ४३ ग्रॅम वजनाचे गंठण आणि ९५ हजार रुपये किमतीचा १९ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस अशा एकूण ५ लाख ६० हजार रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे.
प्रवासाहून परतल्यानंतर मनीषा पाटील यांनी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार पखाले हे करत आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button