पुणे
Pune News : विसर्जन मिरवणुकीत पावणेचार लाखांची सोनसाखळी चोरीला
Pune News : गणपती चौकातील गर्दीचा चोरट्याने घेतला फायदा; विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पाहत उभ्या असलेल्या ३४ वर्षीय व्यक्तीच्या गळ्यातील तीन लाख ८६ हजार ९६९ रुपये किमतीची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. गणपती चौकात २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली.https://maharashtramirror.com/ Pune News
याबाबत हडपसर येथील रहिवाशाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मिरवणूक पाहत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. महिला पोलीस अंमलदार रुपनवर पुढील तपास करीत आहेत.


