क्राईम न्यूजनाशिकनाशिक
Trending

नाशिकचे ‘कॅप्टन’ सेक्स स्कँडल: रुपाली ठोंबरेंचा चाकणकरांवर फेसबुकवरून प्रहार; SIT तपासात पिस्तूल आणि ‘प्रशासकीय’ कनेक्शन उघड

Ashok Kharat Latest News : ‘भोंदू खरात फरार, बजाव ताली!’; ठोंबरेंच्या जहरी पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ, घराड्यात सापडली जिवंत काडतुसे आणि अश्लील करतुतांचा डोंगर

नाशिक‌ :- स्वयंघोषित ‘कॅप्टन’ आणि भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या अश्लील करतुतांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणाने टोकाचे राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ आणि फोटोंनी समाजमन सुन्न केले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दोन दिग्गज महिला नेत्यांमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खरातची पाद्यपूजा केल्याचा जुना व्हिडिओ व्हायरल झाल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याच संधीचा फायदा घेत रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर “राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार… बजाव ताली” अशी खळबळजनक पोस्ट लिहिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, खरातच्या घरातून एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हे शस्त्र त्याने कोणाकडून मिळवले आणि याचा वापर पीडित महिलांना किंवा जमीन व्यवहारात अडथळा ठरणाऱ्यांना धमकवण्यासाठी केला जात होता का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. डिजिटल फॉरेन्सिकच्या माध्यमातून खरातच्या फोनमधील कॉल रेकॉर्ड्स आणि 58 हून अधिक अश्लील व्हिडिओंचा तपास केला जात असून, त्यामध्ये अनेक प्रभावशाली महिलांचे चेहरे असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भोंदू खरातचे जाळे केवळ राजकीय नेत्यांपर्यंतच मर्यादित नसून, त्याचे ‘प्रशासकीय कनेक्शन’ ही आता उघड झाले आहे. अनेक बडे सरकारी अधिकारी त्याच्या दरबारात हजेरी लावत होते आणि त्यांच्या पत्नी व नातेवाईकांच्या नावावर खरातने पाथर्डी, सिन्नर तसेच शिर्डी-ओझर विमानतळ परिसरात कोट्यावधींची गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. जमिनी हडपण्याचे आणि अवैध कब्जा करण्याचे अनेक गंभीर आरोप त्याच्यावर असून, गेल्याच आठवड्यात त्याने एका इमारतीचे भूमिपूजन केल्याची माहितीही उघड झाली आहे. या सर्व प्रकरणाचा तपास आता आर्थिक आणि गुन्हेगारी अशा दोन्ही बाजूंनी सुरू झाला असून, खरातच्या या ब्लॅकमेलिंग रॅकेटमध्ये अजून किती मासे गळाला लागतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button