CRIME NEWS : ज्येष्ठ नागरिकाची ६२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

विश्वास संपादन करून टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांमध्ये रक्कम हस्तांतरित
पुणे CRIME NEWS : शेअर्समध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ६२ लाख ७० हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(ड) अन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. CRIME NEWS
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर २०२५ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपीने फिर्यादींच्या वडिलांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून गुंतवणुकीसंदर्भातील लिंक पाठवली. त्यानंतर एक अॅप डाउनलोड करण्यास सांगून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले.
आरोपीने विश्वास संपादन करून टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांमध्ये रक्कम हस्तांतरित करण्यास भाग पाडले. त्यातून फिर्यादींच्या वडिलांची एकूण ६२,७०,५०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.CRIME NEWS
या प्रकरणातील आरोपी हा धनकवडी परिसरातील ३६ वर्षीय मोबाईलधारक, लिंकधारक व बँक खात्याचा वापरकर्ता असल्याची माहिती असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संगिता देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस करीत आहेत.
CRIME NEWS


