Navi Mumbai News : नवी मुंबई पोलिसांची झडाकेबाज कामगिरी! 24 तासांच्या आत घरफोडीचा छडा

Navi Mumbai Police Latest News : 36 लाखांचे दागिने हस्तगत, 3 आरोपींना बेड्या
नवी मुंबई,कळंबोली :- नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत गुन्हे शाखेने एका मोठ्या घरफोडीचा तपास अवघ्या 24 तासांत पूर्ण करून आरोपींना जेरबंद केले आहे. कळंबोली परिसरात झालेल्या या चोरीतील 36 लाख रुपये किमतीचे 30 तोळे सोन्या-चांदीचे दागिने पोलिसांनी पूर्णपणे हस्तगत केले असून, आरोपींना कल्याण जवळील डायघर परिसरातून अटक करण्यात आली आहे. Navi Mumbai Breaking News
नेमकी घटना काय?
कळंबोली, सेक्टर-16 येथील पृथ्वी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रुबी संतोष पात्रा यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून 9 मार्च 2026 रोजी संध्याकाळी च्या दरम्यान मोठी चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट फोडून सुमारे 30 तोळे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 36 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. Navi Mumbai Police Latest News
गुन्हे शाखेचा ‘दणका’ आणि कारवाई
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उप-आयुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी 10 मार्च रोजी ठाणे जिल्ह्यातील डायघर आणि पडले गाव (ता. कल्याण) परिसरात सापळा रचला.
अटक करण्यात आलेले आरोपी
1) पवन रोहिदास जाधव (वय 25, रा. डायघर)
2) सुमित रोहिदास जाधव (वय 22, रा. पडले गाव)
3) शिवाजी जगन राठोड (वय 23, रा. पडले गाव)
मुद्देमाल हस्तगत आणि पोलीस कोठडी
अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी चोरीला गेलेले सर्व 30 तोळे सोन्या-चांदीचे दागिने (किंमत 36 लाख रुपये) जप्त केले आहेत. नवी मुंबई गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने ही कारवाई करून मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 13 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

