राष्ट्रवादी काँग्रेसचा (शप) महापालिकेवर बैलगाडी व टांगा मोर्चा

वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण यांचा निषेध
निलेश राऊत
पुणे: केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण याविरोधात निषेध व्यक्त करीत सोमवारी ( दि. १८ ) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, पुणे शहरच्या वतीने शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेवर बैलगाडी व टांगा मोर्चा काढण्यात आला.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ मोर्चा काढून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे नागरिक त्रस्त झाले असल्याचा आरोप करण्यात आला. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे ही दरवाढ रद्द झाली नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस )शरदचंद्र पवार) पक्ष, पुणे शहरच्या वतीने देण्यात आला.
यावेळी गटनेते काका चव्हाण, महिला अध्यक्ष स्वाती पोकळे, नगरसेवक गफुर पठाण, नगरसेविका अनिता इंगळे, रविंद्र माळवदकर, दीपक जगताप, अजिंक्य पालकर, अमोघ ढमाले, हर्षद जाधव, प्रवीण तुपे, मकरंद देशमुख, वंदना मोडक, दिलशाद अत्तार, उर्मिला गुंड, जयश्री आदमाने, मेघा सातव तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे न्युज


