Ashadhi Wari 2026 : यंदा मर्यादित उपस्थिती; ‘असे’ असेल देऊळवाड्यातील नियोजन
Ashadhi Wari 2026 : आळंदीत पूरस्थिती गंभीर असल्याने देवस्थानचा मोठा निर्णय; केवळ १६६० जणांनाच देऊळवाड्यात प्रवेश
पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र मिरर
Ashadhi Wari 2026 : इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे आळंदीत निर्माण झालेली पूरस्थिती आणि सुरक्षेची गंभीर कारणे पाहता, यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देऊळवाड्यात भाविकांच्या प्रवेशावर कडक मर्यादा आणण्यात आल्या आहेत. बुधवारी (८ जुलै) होणारा हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि मर्यादित उपस्थितीत पार पडणार असून, एकूण १६६० व्यक्तींनाच देऊळवाड्यात प्रवेश दिला जाणार आहे. याबाबतचे अधिकृत नियोजन आळंदी देवस्थान ट्रस्ट आणि पालखी सोहळा समितीकडून जाहीर करण्यात आले असून, पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. (Ashadhi Wari 2026 alandi palkhi entry limit)
५६० दिंडी प्रतिनिधींना प्रवेश
माऊलींच्या रथापुढे चालणाऱ्या १ ते २७ आणि रथामागे चालणाऱ्या १ ते २० अशा प्रमुख अधिकृत दिंड्यांचा प्रस्थान सोहळ्यात महत्त्वाचा सहभाग असतो. या पूरपरिस्थितीचा विचार करता, यंदा प्रत्येक दिंडीतील केवळ १० प्रमुख वारकऱ्यांनाच देऊळवाड्यात सोडले जाईल. या नियमानुसार एकूण ५६० वारकरी प्रस्थान काळात प्रत्यक्ष मंदिर परिसरात उपस्थित राहून माऊलींच्या सेवेत सहभागी होऊ शकतील. ( Ashadhi Wari 2026 )
Pune Rain Update : पुण्यात पावसाचा हाहाकार! जुने वाडे, भिंती कोसळल्या
मानकरी आणि निमंत्रितांची संख्याही मर्यादित
परंपरेनुसार प्रस्थान सोहळ्यादरम्यान दिला जाणारा नारळ प्रसाद आणि इतर धार्मिक विधींसाठी दिंडीप्रमुख, मानकरी, सोहळ्याचे सहकारी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित असतात. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी यंदा या सर्वांची मिळून एकूण ५०० व्यक्तींचीच मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ( Ashadhi Wari 2026 )
Khadakwasla Dam : धरणातून ५०० क्युसेकचा विसर्ग सुरू; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
अत्यावश्यक सेवेसाठी विशेष पास
धार्मिक विधींसोबतच सोहळा सुबकपणे पार पाडण्यासाठी आणि मंदिर परिसरातील व्यवस्था राखण्यासाठी मानाचे खांदेकरी, देवस्थानचे कर्मचारी, आपत्कालीन आरोग्य पथक, स्वच्छता सेवक आणि पोलीस यंत्रणा सज्ज असणार आहे. या सर्व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या ६०० च्या घरात मर्यादित ठेवण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण १६६० जणांच्या उपस्थितीतच यंदाचा प्रस्थान सोहळा शासकीय नियमांचे पालन करत पार पडेल. ( Ashadhi Wari 2026 )
अफवांवर विश्वास ठेवू नका
“पूरपरिस्थितीमुळे प्रस्थान सोहळा लांबणीवर पडणार अशा अनेक अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. मात्र, प्रस्थान सोहळा नियोजित वेळेनुसारच होईल. देवस्थान ट्रस्ट सर्व दिंडी प्रमुखांशी सतत संपर्कात असून, भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या दिंडी प्रमुखांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे,” असे आवाहन देवस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे आणि पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. ( Ashadhi Wari 2026 )
Rain Update : महाबळेश्वर, पाचगणीसह सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद!
‘आळंदीत येऊ नका, थेट पुढील मुक्कामी सामील व्हा’
पूर परिस्थितीमुळे आळंदीला जोडणारे चारही पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांनी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येण्याचा हट्ट धरू नये, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाने केले आहे. वारकरी आणि भाविकांनी सध्याची नैसर्गिक परिस्थिती पाहून, आळंदीतून पालखी मार्गस्थ झाल्यानंतर पुढील मुक्कामाच्या ठिकाणी थेट सोहळ्यात सहभागी व्हावे, जेणेकरून सुरक्षिततेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही.
A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)


