पुणे

Pune News : गणेशोत्सवात भेसळखोरांवर ‘एफडीए’ची मोठी कारवाई

Pune News : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मारलेल्या विविध धाडींमध्ये १.१८ कोटींचा साठा जप्त, ६ जणांना अटक; पाषाण येथील ‘रंगला पंजाब’ आणि कर्वेनगर येथील ‘मनीषा डोसा सेंटर’ या दोन रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबत

महत्वाचे मुद्दे

  • मानवी आरोग्यास घातक आणि बनावट स्वरूपाचे अन्नपदार्थ साठवून ठेवल्याचे उघडकीस आले
  • पिंपरीतील रसरंग, गणेश स्वीट्स; खेड येथील सहारा डेअरी प्रॉडक्ट्स, बिबवेवाडी येथील मंगल नॅचरोकेअर; आंबेगाव पठार येथील ‘गालखा देवी स्वीट्स
  • नियमांचा भंग करणाऱ्या चार आस्थापनांपैकी एका दुकानाला प्रत्यक्ष सील ठोकण्यात आले
  • भेसळयुक्त साठ्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली २३ लाख रुपये किमतीची २ वाहनेही ताब्यात
  • “गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भेसळयुक्त, निकृष्ट किंवा दिशाभूल करणाऱ्या अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर यापुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरूच राहील.” — अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागhttps://maharashtramirror.com/ Pune News

Pune News : पुणे: गणेशोत्सवाच्या काळात शहरात मिठाई, खवा आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी प्रचंड वाढली असतानाच, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी धडक कारवाई केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मारलेल्या विविध धाडींमध्ये १ कोटी १८ लाख ४३ हजार ३६४ रुपये किमतीचा संशयास्पद आणि भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार व्यावसायिक आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे.Pune News https://maharashtramirror.com/

धाडीत काय-काय आले हाती?
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पुणे विभागातील प्रमुख आस्थापनांवर छापे टाकले. यामध्ये प्रामुख्याने मानवी आरोग्यास घातक आणि बनावट स्वरूपाचे अन्नपदार्थ साठवून ठेवल्याचे उघडकीस आले. Pune News https://maharashtramirror.com/

संशयास्पद खवा व मिठामावा: पिंपरीतील ‘रसरंग’ आस्थापनातून २९,५०० रुपये किमतीचा ५९ किलो खवा जप्त करण्यात आला. तसेच ‘गणेश स्वीट्स’मधून ३८,०८० रुपयांचा ११९ किलो मिठामावा जप्त करण्यात आला.

बनावट हलवा व मिठाई: खेड येथील ‘सहारा डेअरी प्रॉडक्ट्स’वर टाकलेल्या धाडीत ६१,६०० रुपये किमतीचा १,८०८ किलो ‘शाही स्वीट हलवा’ आणि १ लाख ६२ हजार २०० रुपये किमतीचा ८११ किलो ‘ए-१ स्वीट हलवा’ असा बनावट व ‘मिसब्रँडेड’ संशयास्पद साठा जप्त करण्यात आला.

बनावट तूप आणि दिशाभूल करणारी सोहनपापडी: बिबवेवाडी येथील ‘मंगल नॅचरोकेअर’मधून २३,३१६ रुपयांचे ३९.१५ किलो गाईचे तूप जप्त झाले. तर आंबेगाव पठार येथील ‘गालखा देवी स्वीट्स’मधून ग्राहकांची फसवणूक करणारे दावे केल्याप्रकरणी ३० किलो सोहनपापडी जप्त करण्यात आली.

या संपूर्ण मोहिमेत नियमांचा भंग करणाऱ्या आस्थापनांपैकी एका दुकानाला प्रत्यक्ष सील ठोकण्यात आले असून, भेसळयुक्त साठ्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली २३ लाख रुपये किमतीची २ वाहनेही प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत.

दोन प्रसिद्ध हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित
केवळ मिठाई दुकानेच नव्हे, तर अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या उपाहारगृहांवरही ‘एफडीए’ने बडगा उभारला आहे.

पाषाण येथील ‘आर. पी. हॉस्पिटॅलिटीज’ (रंगला पंजाब) आणि कर्वेनगर येथील ‘मनीषा डोसा सेंटर’ या दोन हॉटेल तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा परवान्यातील अट क्रमांक ३ आणि ‘परिशिष्ट-४’ मधील आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन आढळल्याने, त्यांचे अन्न सुरक्षा परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button