पुणे

Pune News : पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेच्या सह-संपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत इच्छुक; शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करण्याचे आश्वासन

Pune News :पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सह-संपर्क प्रमुख आणि इंग्लिश-मराठी स्कूल महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सुदर्शना रमेश त्रिगुणाईत यांनी इच्छुक उमेदवार म्हणून भूमिका मांडली आहे. पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.https://maharashtramirror.com/ Pune News

पुणे हे विद्येचे माहेरघर असून, या भागात मोठ्या संख्येने शिक्षण संस्था आहेत. मात्र, गेल्या सुमारे ३० वर्षांपासून पुणे विभागातून शिक्षक आमदार म्हणून महिला प्रतिनिधित्व झालेले नाही. शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना प्रभावीपणे विधान परिषदेत मांडण्यासाठी महिला प्रतिनिधित्वाची गरज असल्याचे त्रिगुणाईत यांनी सांगितले. https://maharashtramirror.com/ Pune News

इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना मतदानाचा अधिकार मिळवून दिल्याचा दावा

इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा केला. तसेच लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न मांडून इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना मतदानाचा अधिकार मिळवून दिल्याचा दावा त्रिगुणाईत यांनी केला.

शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी पुढील काळातही पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

जुन्या पेन्शन योजनेसह विविध मागण्यांवर भर

२००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्रिगुणाईत यांनी सांगितले. तसेच कमी पटसंख्येमुळे २०२२-२३ मध्ये शेवटच्या वर्गासाठी अपात्र ठरविण्यात आलेल्या शाळांना २०२३-२४ किंवा २०२४-२५ च्या संचमान्यतेतील पदे ग्राह्य धरून अनुदान देण्यासाठी शुद्धीपत्रक काढण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळवून देण्याबरोबरच सर्व शिक्षकांना १०, २० आणि ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा करण्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य विम्याची मागणी

सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करण्याचे आश्वासन त्रिगुणाईत यांनी दिले. शिक्षकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

अनुदानाच्या टप्प्यांबाबत भूमिका

२० टक्के, ४० टक्के, ६० टक्के आणि ८० टक्के अनुदान घेत असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच वर्ग-तुकड्यांना प्रचलित नियमानुसार १ जून २०२६ पासून अनुदानाचे टप्पे लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्रिगुणाईत यांनी सांगितले. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विधान परिषदेत ठामपणे आवाज उठविण्याची भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button