पुणे

MPSC विद्यार्थ्यांचा पुण्यात महाआक्रोश

MPSC : MPSC मधील पेपरफुटी विरोधात आणि स्पर्धा परीक्षेतील इतर मागण्यासाठी उद्या पुण्यात भव्य मोर्चा.

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटी आणि कारभारातील पारदर्शकतेचा अभाव याविरोधात आज, सोमवारी (७ सप्टेंबर २०२६) पुण्यात स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी प्रचंड ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ काढला. राज्यभरातून आलेल्या हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभाग घेत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. सकाळी १० वाजता ओंकारेश्वर मंदिर चौकातून सुरू झालेला हा मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हजारो विद्यार्थ्यांसोबत खासदार सप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे देखील विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

मोर्च्यादरम्यान विद्यार्थ्यांनी MPSC च्या कारभारावर तीव्र आक्षेप घेत काही प्रमुख मागण्या पुढे केल्या आहेत. आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि त्यांच्या जागी स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मुख्य मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच, गट-ब परीक्षेबाबत उपस्थित केलेल्या शंका व आक्षेपांवर आठ दिवसांत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ आणि कृषिसेवा परीक्षेतील वर्णनात्मक पेपरच्या तपासणीतील त्रुटींची चौकशी व्हावी आणि मुंबई क्राईम ब्रँचचा प्राथमिक चौकशी अहवाल त्वरित सार्वजनिक करावा, असे मुद्यांवर विद्यार्थ्यांनी भर दिला. MPSC

Pune Crime : पिंपळे गुरवमध्ये हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

राजकीय नेत्यांचा सहभाग व पाठिंबा
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला तीव्र राजकीय पाठिंबा मिळाला असून, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी प्रत्यक्ष मोर्च्यात सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. “मुलांनी शिक्षण घेऊन देशाची सेवा करायची सोडून रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणे हे सरकारचे मोठे अपयश आहे,” असे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच, तंत्रज्ञानाचा उपयोग का होत नाही, माहीत नाही. अशा अनेक परीक्षा जगभर होतात. भारतातही अनेक परीक्षा आहेत. तिथे पेपर फुटले नाहीत. मग याच परीक्षेत कसे पेपर फुटतात? एवढं एआय, तंत्रज्ञान आहे, त्यामुळे काही तरी करू शकतात. पेपर फुटणे थांबू शकत नाही, यावर माझा विश्वास नाही.

मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा
देशात स्वायत्त संस्था किती आहे, हे मी सांगायला नको. मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, कोणीतरी जबाबदार व्यक्ती पाठवा. मुलांसोबत चर्चा करा. सगळे मिळून मार्ग काढू. सर्व आपली मुले आहेत. त्यांच्यासाठी मार्ग काढू. सरकार कुणासाठी आहे. सरकार प्रत्येकबाबतीत अपयश आहे. तुमच्या चॅनलचे तास कमी पडतील, तितके आंदोलने राज्यात होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या, हे देखील तुमच्या चॅनलवर पाहिले. MPSC

शेतकरी, महिला, युवक सर्व रस्त्यावर आहेत. सुळे पुढे म्हणाल्या, ‘ मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून लवकरात लवकर तोडगा काढावा. मोर्चात झालेली गर्दी पाहून विद्यार्थ्यांचा आक्रोश लक्षात येत आहे. अध्यक्ष आणि सचिव यांच्या राजीनाम्याची विद्यार्थी वेळोवेळी मागणी करतात, यावरती सरकारने विचार करावा’, अशी मागणी त्यांनी पुढे केली. MPSC

MPSC मधील पेपरफुटी विरोधात आणि स्पर्धा परीक्षेतील इतर मागण्यासाठी उद्या पुण्यात भव्य मोर्चा.

दिनांक: उद्या (सोमवार, ७ सप्टेंबर २०२६)
वेळ: सकाळी ठीक १०:०० वाजता
मोर्चाचा मार्ग: ओंकारेश्वर मंदिर चौक, पुणे (येथून सुरुवात) ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे (समापन) pic.twitter.com/X8NAUlD4QT— स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) September 6, 2026

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button